नवी दिल्ली : भाभा अणु संशोधन केंद्र म्हणजे BARC मध्ये बोगस शास्त्रज्ञ अख्तर हुसेनीच्या भावाला संवेदनशील माहिती परदेशात पुरवण्याच्या नावाखाली दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील ही तिसरी अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी मुख्य आरोपी अख्तर हुसेनी याला मदत करणाऱ्या सायबर कॅफे चालकास अटक केली होती.
दिल्लीतून अटक करण्यात आलेला आरोपी अदिल हुसेनी उर्फ सय्यद अदिल हुसेन उर्फ मोहम्मद अदिल हुसेनी उर्फ नसीमुद्दीन याला दिल्लीच्या सिमापुरी भागातून अटक केली आहे. चौकशीदरम्यान, आरोपी मोहम्मद अदिल हुसेनी उर्फ सय्यद अदिल हुसेन उर्फ नसीमुद्दीन हा आपल्या भाऊ अख्तर हुसेनी सोबत परदेशी देशांना संवेदनशील माहिती पुरविणे तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक भारतीय पासपोर्ट मिळविण्याच्या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून एक मूळ आणि दोन बनावट पासपोर्टच्या प्रती जप्त करण्यात आल्या. दिल्लीच्या स्पेशल सेल पोलिसांनी त्याला अटक करत गुन्हा दाखल केला आहे आरोपीला श्री. साहिल मोंगा, कार्यकारी न्यायिक दंडाधिकारी (JMFC) यांच्यासमोर हजर करण्यात आले असता, पोलिस कोठडी (PC) साठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या: