Seema Haider Video Viral: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कडक पावले उचलली आहेत. सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. अशा परिस्थितीत, भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना आता देश सोडून पाकिस्तानात परत जावे लागेल. अशा परिस्थितीत, पाकिस्तानमधून आपल्या प्रियकरासाठी देश सोडून भारतात पळून आलेली सीमा हैदरला भारत सोडावा लागणार का? अशा चर्चा आहेत. अशातच सीमा हैदरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती म्हणते आहे की, मला पाकिस्तानला जायचं नाही. सीमा हैदरने व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनाही आवाहन केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सीमा तिचा पती सचिनसोबत दिसत आहे. ज्यामध्ये ती म्हणत आहे की, मला पाकिस्तानला जायचे नाही. त्या दोघांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांना आवाहन केले की, मी तुमच्या आश्रयात आहे, मला त्यांच्यावर विश्वास आहे. मी पाकिस्तानची मुलगी होती, आता मी भारताची सून आहे' मला इथेच राहू द्या, असंही पुढे ती म्हणते.
हजारो लोकांनी व्हिडिओ पाहिला सचिन सीमाचा व्हिडिओ
हा व्हिडिओ seema____sachin10 नावाच्या सोशल मिडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. या पोस्टवर युजर्सनी संमिश्र कमेंट्स केल्या आहेत.सीमा हैदरने 2023 मध्ये भारतात प्रवेश केला.
सीमा हैदरचे प्रकरण पुन्हा चर्चेत
सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, सीमाचा खटला इतर पाकिस्तानी नागरिकांपेक्षा वेगळा आहे. सीमाची सर्व कागदपत्रे गृह मंत्रालय आणि एटीएसकडे जमा आहेत. तसेच त्यांची याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. त्यांनी सांगितले की सीमाला उत्तर प्रदेश कोर्टाकडून जामीन मिळाला आहे आणि ती सर्व कायदेशीर अटींचे पालन करत आहे. वकिलाने असाही दावा केला की सीमा आणि तिच्या कुटुंबाला पाकिस्तान समर्थित घटकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, ज्यांच्याबाबत वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या जात होत्या.
राष्ट्रपतींकडे याचिका प्रलंबित
एपी सिंह म्हणाले की, सीमा आश्रयाच्या आधारावर भारतात राहत आहे आणि तिला भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारवर पूर्ण विश्वास आहे. दरम्यान, या घटनेदरम्यान, सीमा हैदरचा पहिला पती गुलाम हैदरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो सीमाला पाकिस्तानात परत पाठवायला हवे असे म्हणत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी माझ्या मुलांसाठी आसुसलो आहे. भारत सरकारने माझ्या मुलांनाही पाकिस्तानात परत पाठवावे. जर तुम्ही सीमाला पाकिस्तानला पाठवू शकत नसाल तर तिला तिथे शिक्षा करा. तिला मदत करणारा, तिचा मानलेला भाऊ एपी सिंहला लाज वाटली पाहिजे.