Seema Haider Pregnant: पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरचा (Seema Haider-Sachin Meena) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेली सीमा आता पुन्हा गरोदर (Seema Haider Pregnant) आहे. सीमाने तिच्या युट्यूब चॅनलवर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. सीमा सध्या 7 महिन्यांची गर्भवती असून फेब्रुवारी 2026 मध्ये प्रसूती होण्याची तारीख डॉक्टरांनी दिल्याचं सचिन मीनाने व्हिडीओमध्ये सांगितले. दरम्यान, सीमा सहाव्यांदा गर्भवती राहिली आहे. पाकिस्तानमध्ये असताना सीमाने 4 मुलांना जन्म दिला होता. यांनतर अवैधरित्या पाकिस्तानमधून भारतात आल्यानंतर सचिन आणि सीमाने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. आता सचिन आणि सीमा दुसऱ्या बाळाची अपेत्रा बघत असून सीमा सहाव्यांदा आई होणार आहे. 

Continues below advertisement

सीमा आणि सचिनची प्रेमकहाणी सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांवर आधीच चर्चेचा विषय बनली आहे. आता सीमाच्या गरोदरपणामुळे दोघंही पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सध्या सीमाला पाच मुले आहेत. यापैकी चार मुले तिचा पहिला पती गुलाम हैदर यांच्या पोटी पाकिस्तानात जन्माला आली. भारतात परतल्यानंतर सीमाने सचिन मीनासोबत मीरा नावाच्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता पुन्ही सीमा गरोदर राहिली आहे. हे मूल सचिनचे दुसरे आणि सीमाचे सहावे असेल. (Seema Haider Pregnant)

पबजी खेळताना प्रेम झालं आणि पाकिस्तानातून थेट भारतात आली- (Seema Haider-Sachin Meena)

सीमा हैदर हिने 2023 मध्ये भारतात अवैधरित्या भारतात घुसखोरी केली होती. पबजी गेम खेळत असताना सीमाचा सचिनवर जीव जडला आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सीमा विना व्हिसा आणि पासपोर्ट नेपाळमार्गे भारतात आली होती. दरम्यान, तिच्याबाबत माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली होती. सध्या ती जामीनावर बाहेर आहे. सीमा हैदरचा दावा आहे की, मी सचिनसोबत विवाह केलाय आणि आता आयुष्यभर भारतात राहाणार आहे. 

Continues below advertisement

सीमा ही पाकिस्तानातील सिंध प्रांताची राहिवासी- (Seema Haider Pregnant)

सीमा ही पाकिस्तानातील सिंध प्रांताची राहिवासी आहे. प्रेमासाठी भारतात आल्यानंतर तिला अनेक कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यानंतर तिला जामीन मिळाला होता. सीमा हैदर ही पाकिस्तानातून भारतात आली होती. सीमा आणि तिचा प्रियकर सचिन मीणा यांची प्रेम कहाणी देशभर चर्चेचा विषय ठरली होती. सीमा 2023 मध्ये पाकिस्तानातून नेपाळला गेली आणि तिथून आपल्या प्रेमाला भेटण्यासाठी भारताता आली होती. आता त्यांच्या प्रेमाची कहाणीला खरी रंगत आली आहे. दोघं चांगल्या पद्धतीने संसार करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

ही बातमीही वाचा:

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अटारी वाघा बाॅर्डरवर अनेक कुटुंबांची अन् मनांची 'फाळणी' होत असताना पाकिस्तानी सीमा हैदर कायद्याच्या तडाख्यातून कशी वाचली? नेमकं काय घडलं??