सुयोग्य वर शोधण्यासाठी तिने स्वत:चा बायोडेटा तयार तर केला. मल्याळममध्ये लिहिलेला हा बायोडेटा तिने फेसबुकवर अपलोड केला आहे. तिची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
"मी सिंगल आहे. लग्नासाठी सुयोग्य वराच्या मी शोधात आहे. कोणाच्या पाहण्यात मुलगा असेल तर मला सांगा. माझी कोणतीही अपेक्षा नाही. पत्रिका, जात-पात या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. माझे आई-वडील नाहीत. मी फॅशन डिझाईनिंगमध्ये बीएससी केलं आहे. माझं वय 28वर्षे आहे. माझा भाऊ मुंबईत सीनियर आर्ट डायरेक्टर आहे. तर बहिण सिव्हिल इंजिनीअरिंग करत आहे,"अशी जाहिरातच तिने केली आहे.
ज्योतीने 26 एप्रिलला ही जाहिरात पोस्ट केली होती. या पोस्टला आतापर्यंत सहा हजारांहून अधिक शेअर मिळाले आहेत. इतकंच नाही तर फेसबुकने लग्न जुळवणारी मेट्रिमोनियल साईट सुरु करावी, अशी विनंती तिनं मार्क झुकरबर्गला केली आहे.
तिची ही जाहिरात चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या पोस्टला फेसबुकवर भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लग्न ठरवण्यासाठी ज्योतीने लढवलेली ही शक्कल भाव खाऊन गेली आहे.
मागील वर्षी केरळच्याच रजनीश मनजेरीने या फोटोग्राफरनेही अशीच एक पोस्ट लिहिली होती. यानंतर त्याला आयुष्याचा सहचारिणी मिळाली. यावर्षी एप्रिल महिन्यात त्याचं लग्न झालं.