उरीत आतापर्यंत 10 दहशतवाद्यांना कंठस्नान, 1 जवान शहीद
एबीपी माझा वेब टीम | 20 Sep 2016 06:25 PM (IST)
श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील उरीमध्ये दहशतवाद्यांना भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आतापर्यंत एकूण दहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर आणखी पाच दहशतवादी दडून बसल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. लच्छीपोरा भागात दोन्ही बाजूंनी गोळ्यांच्या फैरी झडत आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून छोट्या स्वयंचलित शस्त्रांच्या साह्यानं नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैन्याच्या दिशेनं गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या गोळीबाराला लगेचच प्रत्युत्तर देण्यात आलं.