नवी दिल्ली : स्मार्ट सिटीची तिसरी यादी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. देशातील 12 राज्यांमधील 27 शहरांचा या तिसऱ्या यादीत समावेश आहे. महाराष्ट्रातील पाच शहरांचा या 27 शहरांना समाविष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू यांनी तिसरी यादी जाहीर केली.


महाराष्ट्रातील ‘या’ पाच शहरांचा समावेश

  1. कल्याण

  2. नाशिक

  3. नागपूर

  4. ठाणे

  5. औरंगाबाद


 

देशातील या’ 27 शहरांचा समावेश :

अमृतसर

कल्याण

उज्जैन

तिरुपती

नागपूर

मंगलुरु

वेल्लुरे

ठाणे

ग्वालियर

आगरा

नाशिक

राउरकेला

कानपूर

मदुरै

तुंकुर

कोटा

नमची

जालंधर

शीमोग

सेलम

अजमेर

वाराणसी

कोहिमा

कबरधारवाद

औरंगाबाद

वडोदरा

मोदी सरकारने 2019-2020 पर्यंत जवळपास 100 शहरांचा कायापालट करण्याचं निश्चित केलं आहे. त्यादृष्टीने स्मार्ट सिटीची संकल्पना पुढे आली.