नवी दिल्ली: सरन्यायधिशांना शिक्षा सुनावणाऱ्या कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. एस. कर्नन यांना सुप्रीम कोर्टानं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कर्नन यांना 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तसेच कर्नन यांना तात्काळ अटक करण्याचे आदेशही पश्चिम बंगालच्या पोलीस महासचिवांना दिले आहेत. त्याचप्रमाणे कर्नन यांनी दिलेले आदेश माध्यमांनी छापू नयेत. असे आदेशही सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. कर्नन यांनी कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हा निर्णय सुनावण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भ्रष्टाचारी असल्याचं पत्र कर्नन यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कर्नन यांची मानसिक तपासणी करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं.

संबंधित बातमी : कोर्टाच्या अवमान प्रकरणी सुनावणीला जस्टिस कर्नन यांची दांडी