SC On Vaccination : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दरम्यान, कोरोना लसीशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या कोविड लसीकरण धोरणावर शिक्कामोर्तब केले असले तरी कोणावरही लसीकरणाची सक्ती करता येणार नाही, असे म्हटले आहे. तसेच हे वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. कोणावरही लसीकरण करण्याची सक्ती करता येणार नाही. याशिवाय ज्यांना कोविडची लस मिळालेली नाही, अशा लोकांना सार्वजनिक सुविधांचा वापर करण्यापासून रोकण्याचे आदेश राज्य सरकारांनी मागे घ्यावेत, असे न्यायालयाने सुचवले. 


कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढली
दरम्यान, भारतात सलग तिसऱ्या आठवड्यात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत, परंतु शेवटच्या आठवड्यात कोरोनामुळे मृतांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे.


20 राज्यांमध्ये वाढ नोंदवली गेली


गेल्या आठवड्यात (25 एप्रिल ते 1 मे पर्यंत) भारतात 22,200 लोकांना कोरोनाची लागण झाली. गेल्या आठवड्यात आढळलेल्या 15,800 संक्रमितांपेक्षा हे 41% जास्त आहे. त्या आठवड्यात कोरोना प्रकरणामध्ये 96% ची वाढ दिसून आली. दिल्ली, हरियाणा आणि यूपीमध्ये सर्वाधिक संक्रमित आढळले आहेत. एकूण संक्रमितांपैकी हे प्रमाण 68% आहे. रविवारी संपलेल्या आठवड्यात, देशातील 20 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे देशात संसर्गाचा प्रसार सुरूच असल्याचे सूचित होते.  बहुतेक राज्यांमध्ये, एका आठवड्यात सरासरी रुग्णांची संख्या 1 हजारांपेक्षा कमी होती. 


महत्त्वाच्या बातम्या


Coronavirus Cases Today : सलग दुसऱ्या दिवशी कोरोना संसर्ग घटला, गेल्या 24 तासांत 3157 नवे रुग्ण, 50 जणांचा मृत्यू


Viral Video : भीषण! तरुणाला झाडाला लटकावलं अन् क्रूरतेच्या सगळ्या सीमा पार केल्या... नेमकं काय घडलं?


Crime : रेल्वे स्टेशनवर पति आणि मुलांसमोर पत्नीवर सामुहिक अत्याचार, आरोपी फरार


​BSF Recruitment 2022 : बीएसएफमध्ये नोकरी करण्याची संधी, कसा कराल अर्ज? जाणून घ्या...