मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने एफडीच्या (मुदत ठेव) व्याजदरात वाढ करत आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे. मॅच्युरिटी काळाच्या एफडीतील व्याजदरात वाढ करण्यात आली. ही वाढ सामान्य नागरिक आणि जेष्ठ नागरिक या दोघांसाठीही असेल.


 व्याजदरात किती वाढ झाली?  

एक कोटींपेक्षा कमी रकमेच्या आणि एक ते दहा वर्षांच्या कालावधीतील एफडीच्या व्याजदरात 0.05 ते 0.1 टक्क्याने व्याजदरात वाढ होईल. हे वाढीव व्याजदर आजपासून (30 जुलै) लागू होतील.

एक कोटींपेक्षा कमी रकमेवरील व्याजदर

एक ते दोन वर्षांच्या एफडीवर आधी 6.65 टक्के व्याज मिळत होते, त्यावर आता 6.7 टक्के व्याज मिळेल.

दोन ते तीन वर्षांच्या एफडीवर आधी 6.65 टक्के एवढे व्याज मिळायचे, त्यामध्ये वाढ होऊन आता 6.75 टक्के व्याज मिळेल.

तीन ते पाच वर्ष या कालावधीच्या एफडीवर आधी 6.7 टक्के व्याज मिळायचे. आता हा व्याजदर 6.8 टक्के असेल.

पाच ते दहा वर्षांच्या एफडीसाठी याआधी ग्राहकांना 6.75 टक्के व्याज मिळायचे, ते आता 6.85 टक्के मिळेल.

एक कोटींपेक्षा कमी रकमेवरील व्याजदर (जेष्ठ नागरिक)

 कालावधी           व्याजदर (आधी)   व्याजदर (आता)

एक ते दोन वर्ष            7.15                  7.2

दोन ते तीन वर्ष           7.15                   7.25

तीन ते पाच वर्ष           7.2                    7.3

पाच ते दहा वर्ष           7.25                   7.35

एसबीआयने एफडीवरील व्याजदरात वाढ केल्यानंतर आता इतर बँकाही एफडीच्या व्याजदरात वाढ करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.