Saurabh Rajput Murder Case : उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये झालेल्या सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल सध्या तुरुंगात आहेत. दोघांना मुळाहिजा बॅरेकमधून जनरल बॅरेकमध्ये हलवण्यात आले आहे. साहिलला 18A आणि मुस्कानला 12B मध्ये बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे. साहिल आणि मुस्कान यांना एकाच बॅरेकमध्ये राहायचं आहे. साहिल आणि मुस्कान यांनी अधिकाऱ्यांना एकाच बॅरेकमध्ये राहण्याची मागणी केली होती, मात्र जेल मॅन्युअलचा हवाला देत अधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य केली नाही. कायद्यानुसार हे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

इंदिरा नगर, ब्रम्हपुरी येथील रहिवासी सौरभ राजपूत याचा मृतदेह 18 मार्च रोजी ब्रह्मपुरी येथील इंदिरा नगर येथील त्याच्या राहत्या घरात एका निळ्या ड्रममध्ये सापडला होता. त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी उर्फ ​​सोभी हिचा प्रियकर साहिलसोबत मिळून त्यांनी सौरभचा खून केला होता. मृतदेह कापून ड्रममध्ये टाकून वर सिमेंटचे मिश्रण टाकून ते बंद करण्यात आले होते. त्यानंतर दोघेही हिमाचलला फिरण्यासाठी गेले होते. तेथून परतल्यानंतर हा खुलासा झाला आणि घटनेने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी मुस्कान आणि साहिलला अटक करून त्यांना अटक केली आहे. अटकेनंतर मुस्कान आणि साहिल आता तुरुंगात आहेत.

मुस्कान-साहिल मुळाहिजा बॅरेकमधून बाहेर आले आहेत. दोघांनाही मुख्य बॅरेकमध्ये हलवण्यात आले आहे. आता मुस्कान आणि साहिलला तुरुंगाच्या नियमानुसार काम करावे लागणार आहे. मुस्कानने टेलरिंग शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर साहिलने शेती करण्याची विनंती केली आहे. कारागृह प्रशासनाने हे मान्य केले आहे. मुस्कान-साहिल न्यायालयीन कोठडीत आहेत. 14 दिवसांनंतर त्यांना 2 किंवा 3 एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुस्कान-साहिल यांच्या विरोधात संतापाचा प्रकार घडल्यानंतर या दोघांनाही न्यायालयात हजर करण्याची जोखीम पत्करण्याच्या मन:स्थितीत पोलीस प्रशासन नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांना न्यायायात हजेरी लावण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

पोलिसांच्या चार्जशीटमध्ये नेमकं काय?

या हत्येमागे तंत्र-मंत्र या कृतीसारखे कोणतेही कारण नसल्याचे पोलिसांनी केस डायरीमध्ये स्पष्ट केले. प्रेम प्रकरणामुळे साहिल आणि मुस्कानने सौरभची हत्या केली. साहिल आणि मुस्कान दोघेही ड्रग्ज व्यसनी होते आणि दोघांना एकत्र राहायचे होते. सौरभ जिवंत असताना दोघांचे लग्न होऊ शकणार नाही, त्यामुळे सौरभची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपपत्रात इलेक्ट्रॉनिक पुरावे, घटना स्थळावरून सापडलेले पुरावे आणि शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचे जबाब नोंदवले आहेत. मोबाईल, मृतदेह, रक्ताने माखलेले कपडे, पिशवी, ड्रम आणि रक्ताने माखलेले बेडशीट फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे.

मुस्कान आणि साहिल यांना लग्न करायचे होते, त्यामुळे त्यांनी सौरभची हत्या केल्याचे या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस तपासात तंत्र मंत्र यासारखा कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही. साहिल आणि मुस्कान यांच्याशिवाय तिसऱ्या व्यक्तीचा या हत्येत सहभाग नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. केस डायरीमध्ये पोलिसांनी सांगितले की, मुस्कानने चाकू, ड्रम आणि सौरभला बेशुध्द करण्यासाठी औषध आणले होते, तर साहिलने सिमेंट आणले होते. मृतदेह ड्रममध्ये बंद करण्याची कल्पना साहिलची होती, अशी माहिती समोर आलेली आहे. 

सौरभचा मृतदेह 18 मार्च रोजी ब्रह्मपुरी येथील इंदिरानगर येथील त्याच्या राहत्या घरातून सापडला होता. मृतदेह एका ड्रममध्ये टाकून सिमेंट टाकून तो गोठवण्यात आला होता. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले, नंतर घर सील करण्यात आले होते.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुस्कान रस्तोगीने तिचा प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने पती सौरभ राजपूतची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि ते एका ड्रममध्ये भरून वरून काँक्रिट सिमेंट ओतलं. एवढंच नाही तर यानंतर मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला हे दोघे त्यानंतर हिमाचल प्रदेशला फिरायला गेले. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला बेड्या ठोकल्या आहेत. सौरभ राजपूतच्या हत्येच्या आधी मुस्कान रस्तोगी तिच्या बेशुद्ध पती सौरभ राजपूतच्या छातीवर बसली होती, तेव्हा तिचा प्रियकर साहिल शुक्लाने तिला चाकू दिला आणि सौरभच्या छातीत तीन वेळा वार करण्यासं सांगितलं होतं. राजपूतच्या छातीत तीन वेळा वार करण्यात आले होते, अशी माहिती आता शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. सौरभ राजपूतची मान कापलेली, त्याचे पाय कापलेले आणि धड तुटलेले होते, अशी माहिती शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या डॉक्टरांनी सांगितलं. 

मुस्कान रस्तोगी 27 वर्षांची असून 2016 साली तिने सौरभ राजपूतशी लग्न केले होते. या लग्नाला दोन्ही कुटुंबाचा विरोध होता. सौरभने मुस्कानसाठी त्याच्या कुटुंबियांना सोडले. दोघेही मेरठमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. मुस्कानने 2019 साली एका मुलीला जन्म दिला. मुलीला जन्म दिल्यानंतर मुस्कान आणि तिचा बालपणीचा मित्र साहिल शुक्ला पुन्हा एकदा भेटले आणि त्यांच्यात संबंध सुरू झाले. मुस्कान आणि साहिल इयत्ता आठवीपर्यंत एकाच वर्गात होते.

तुरुंगात पती-पत्नी एकाच बराकीत राहतात का?

एका हिंदी वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, झाशी जिल्हा कारागृह अधीक्षक विनोद कुमार म्हणतात की, तुरुंगात पुरुष आणि महिला कैद्यांना एकत्र ठेवले जात नाही. दोघांसाठी स्वतंत्र बॅरेक करण्यात आले असून ते वेगळे ठेवण्यात आले आहेत. पती-पत्नी तुरुंगात असले तरी त्यांना स्वतंत्र बराकीत ठेवले जाते. यासाठी वेगळा नियम नसला तरी सुरक्षेच्या कारणास्तव महिला आणि पुरुष कैद्यांना वेगळे ठेवले जाते.