Loksabha and Rajya Sabha : संसदेचं पावसाळी (Sansad Monsoon Session) 18 जुलैपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल संसदेत काही असंसदीय शब्दांवर बंदी घातल्यानंतर आता आणखी एक नवा आदेश लोकसभा सचिवालयानं खासदारांना दिला आहे. संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं उपोषणं करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच संसद परिसरात कोणतीही धार्मिक कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या आधी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांसाठी असंसदीय शब्दांची यादी जाहीर करण्यात आली होती. या असंसदीय शब्दांना लोकसभा आणि राज्यसभेत वापरणं असंसदीय मानलं जाणार आहे. लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्द 2021 या शीर्षकासह ही यादी प्रकाशित करण्यात आली असल्याची माहिती समोर आली होती.
कोणतेही शब्द प्रतिबंधित केलेले नाहीत, लोकसभा अध्यक्षांचं स्पष्टीकरण
दरम्यान असंसदीय शब्द काढून टाकण्याचं वृत्त आल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, कोणतेही शब्द प्रतिबंधित केलेले नाहीत, काढून टाकण्यात आलेल्या शब्दांचे संकलन सुरू आहे. ही लोकसभेची प्रक्रिया आहे. 1959 पासून चालू आहे. संसदेत चर्चा आणि संवाद सुरू असताना पीठासीन अधिकारी काही शब्द काढून टाकण्याची सूचना करतात, चर्चा करणाऱ्यांना संसदीय परंपरेची माहिती नसते. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते हटविले जाते. हे सर्व सदस्यांच्या नकळत घडते. आम्हाला हा अधिकार आहे. नियमानुसार, शब्दांवर बंदी नाही. संभ्रम निर्माण करू नका, असं बिर्ला यांनी स्पष्ट केलं आहे.
या शब्दांना बंदी?
जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, जयचंद, भ्रष्ट, बाल बुद्धी, स्नूपगेट, शर्म, दुर्व्यवहार, विश्वासघात, ड्रामा, पाखंड, अक्षम, शकुनी, जयचंद, लॉलीपॉप, चांडाल चौकडी, गुल खिलाए, पिट्ठू , कमीना, काला सत्र, दलाल, खून की खेती, दोहरा चरित्र, निकम्मा, नौटंकी, ढिंढोरा पीटना, बहरी सरकार, चिलम लेना, छोकरा, कोयला चोर, गोरू चोर, चरस पीते हैं, सांड, खालिस्तानी, विनाश पुरुष, तानाशाही, तानाशाह, अराजकतावादी, गद्दार, अपमान, गिरगिट, गूंस, घड़ियाली आंसू, असत्य, अहंकार, काला दिन, काला बाजारी, खरीद फरोख्त, दंगा, दलाल, दादागीरी, बेचारा, संवेदनहीन, सेक्सुअल हरेसमेंट हे हिंदी शब्द हटवण्यात आले असल्याचं समोर आलं होतं.
नियम 381 नुसार काढले जातात असंसदीय शब्द
लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाच्या प्रक्रियेत जर अध्यक्षांना एखादा शब्द अपमानजनक किंवा असंसदीय वाटला तर तो शब्द हटवण्यासाठी ते आदेश देतात. तर नियम 381 नुसार सभागृहाच्या कार्यवाहीचा एखादा भाग हटवायचा असेल तर तो अध्यक्षांच्या आदेशाने हटवण्यात येतो.
इतर महत्वाच्या बातम्या
गद्दार, लॉलीपॉप, शकुनी, जयचंदसह अनेक शब्द संसदेत बॅन! असंसदीय शब्दांची यादी जाहीर- वाचा यादी