India Weather Update : देशातील अनेर राज्यात सध्या मुसळधार पावसानं हाहाकार घातला आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जनजवन विस्कळीत झालं आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळं गुजरातमधील अनेक जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले आहेत. गुजरातमधील जुनागढ, गिर, सोमनाथ, अमरेली, भावनगर, द्वारकापोरबंदर, सुरत, तापी, नवसारी आणि वलसाड या जिल्ह्यांमध्ये पुरामुळं लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. दरम्यान, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील काही काळ ठप्प होती.


गुजरातच्या साबरकांठामध्ये नद्या तुडुंब 


गुजरातमधील साबरकांठा येथे मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सध्या गुजरातला मुसळधार पाऊस आणि पुरापासून दिलासा मिळला नाही. आजही जुनागढ, गिर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर द्वारका, पोरबंदर, सूरत, तापी, नवसारी आणि वलसाड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट सुरू आहे.


मध्य प्रदेशातही पावसाचा कहर 


मध्य प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे नागरिक त्रस्त आहेत. सिहोरमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिहोरमध्ये एक कार्यक्रम सुरु असताना सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला. यामध्ये 14 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून बाधित भागातील वीज खंडित करण्यात आली आहे.


महाराष्ट्रातील अनेक नद्यांचा तांडव


महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. महाराष्ट्रात पूर आणि अतिवृष्टीमुळं पुरामुळे राज्यात आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अमरावती इथे इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. दुसरीकडे मुसळधार पावसानंतर नागपुरातील एका हॉटेलच्या छताचा काही भाग कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडल्याची घटना घडली. मुंबईतही रोरदार पाऊस सुरुच आहे. पावसाचा वेग कमी झाल्यानं अनेक भागात दिलासा मिळाला. मुंबईत ऑरेंज अलर्ट कायम आहे. 


कर्नाटकात पूरस्थिती


कर्नाटकातही मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पूर आणि मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 32 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पूरग्रस्त भागावर लक्ष ठेवून आहेत. लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने 500 कोटी रुपयींची मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्त भागात शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.


महत्वाच्या बातम्या: