‘भीमा-कोरेगावची घटना निंदनीय’
‘भीमा-कोरेगावची घटना महाराष्ट्राच्या दृष्टीने खरोखरच निंदनीय आहे. शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या भूमीत ही घटना घडणं हे दुर्दैव आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा 'काळा दिवस' आहे. आपण संयम पाळला पाहिजे.’ असं ते यावेळी म्हणाले.
‘समाजकंटकांवर कारवाई झालीच पाहिजे’
‘जे समाजाला विघातक मार्गाला लावण्याचं काम करत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. मग ते कोणीही असू दे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कारण पुन्हा महाराष्ट्रात आम्हाला हा दिवस नाही पाहायचा.’ असंही संभाजीराजे म्हणाले.
‘दलित आणि मराठा समाजात फूट नाही’
‘मला वाटत नाही दलित आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न झालेला आहे. शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. तर शाहू महाराजांनी बहुजन समाजाला एकत्र आणलं. त्या बहुजन समाजातही मराठा आणि दलित समाज एकत्र होता. त्यामुळे महाराष्ट्रात अशा हिंसक घटना घडवणाऱ्यांना बाहेर काढलं पाहिजे.’ असं म्हणत संभाजीराजांनी कारवाईची मागणी केली आहे.
‘दलित समाज आपला धाकटा भाऊ’
‘मराठा समाजाला मी एवढंच सागेंन की, आपण मोठा भाऊ आहोत आणि दलित समाज आपला धाकटा भाऊ आहे. बहुजन समाजाल एकत्र घेऊन आपल्याला नांदायचं आहे.’ असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे.
‘यापुढेही गोडीगुलाबीनं राहूयात’
‘विघातक लोकांसाठी आपण कोणतंही हिंसक कृत्य करु नये. आपण पूर्वी जसे राहत होतो. त्याचप्रमाणे यापुढेही गोडीगुलाबीनं राहूयात. असं मी सर्वांना आवाहन करतो. काही समाजकंटक लोकं आहेत जे फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना सरकारनं सोडू नयेत.’ असं म्हणत संभाजीराजांनी भीमा-कोरेगाव घटनेचा निषेध केला.
VIDEO :
संबंधित बातम्या :
भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे भाजप आणि संघाचा हात : मायावती
याकूबप्रमाणे संभाजी भिडे, एकबोटेंवर गुन्हे दाखल करा: आंबेडकर
पुण्यात जिग्नेश मेवाणी, उमर खालिदविरोधात पोलिसात तक्रार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलल्या
एसटी तुमचीच, कृपया मोडतोड करु नका, परिवहनमंत्र्यांचं आवाहन