Jaggi Vasudev Feet Pic controversy: सदगुरु जग्गी वासुदेव हे सध्या त्यांच्या ईशा फाऊंडेशनवर झालेल्या कारवाईमुळे आणि मद्रास हायकोर्टाने ओढलेल्या ताशेऱ्यांमुळं चांगलेच चर्चेत आहेत. पण सध्या सोशल मिडियावर त्यांच्याविषयी एक नवाच वाद सुरु झालाय. आपल्या आत्मजागृकतेच्या शिकवणीसाठी ओळखले जाणारे जग्गी वासुदेव म्हणजेच सदगुरु स्वत:च्या पायांच्या प्रतिमेची फ्रेम त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर विकत असल्याचे समोर येत आहे. इंटरनेटवर सध्या या फ्रेमचा फोटो अनेकजण पोस्ट करत असून यावर मोठी टीका करण्यात येत आहे.


सदगुरुंच्या पायाचा फोटो किती रुपयाला विकला जातोय?


आपल्या पायांच्या प्रतिमेचा फ्रेम केलेला फोटो या अधिकृत संकेतस्थळावर 3200 रुपयाला विकला जात असल्याचं सांगण्यात येतंय. यावरून सोशल मिडियावर मोठा गदारोळ होत आहे. 


सदगुरु जग्गी वासुदेव यांचे ईशा फाऊंडेशन ही संस्था ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी संस्था असून दोन मुलींना संन्यासी होण्यासाठी आश्रमात कोंडल्याच्या आरोपावरून मद्रास हायकोर्टानंही जग्गी वासुदेव यांच्यावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. यानंतर त्यांच्या कोयंबतूरच्या इशा फाऊंडेशनवर झडतीही घेण्यात आल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.


 






फोटो विकताना खाली लिहीलंय...


 ईशा लाईफ ई-शॉप ३२०० रुपये एवढ्या किमतीत सदगुरुंच्या पायाच्या प्रतिमा विकतात. याच्या उत्पादनाच्या माहितीत हे सदगुरुंचे पाय असल्याचं म्हटलंय. कोणत्याही प्रोडक्टच्या डिस्क्रीप्शनमध्ये त्याबद्दलची जी अधिकची माहिती असते त्यात असं म्हटलंय, “गुरुंच्या चरणी नतमस्तक होणे हीच कृती एखाद्याचे सान्निध्य वाढवते आणि गुरूंशी सखोल संबंध निर्माण करते,” असे वर्णन केले आहे.. सद्गुरुंच्या पायाची प्रतिमा "सुंदर लाकडी चौकटीत" येते आणि "सद्गुरूंशी तुमचा संबंध दृढ करण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम" म्हणून काम करते. असं यात म्हटलंय.


इंटरनेटवर काय आल्या प्रतिक्रीया?


इंटरनेटवर सदगुरुंच्या पायाच्या प्रतिमेचा फोटो आणि त्याची एकूणच विक्रीची पद्धती हास्यास्पद असल्याचं दिसतंय. लोकांना मुर्ख बनवणं अतिशय सोपं असल्याचं काहींनी म्हटलंय. तर काहींना हे फोटो विकत घेणारेही असून त्यावर प्रतिक्रीया देणारेही असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले. काहींनी सदगुरुंविषयी चांगलंही लिहीलं आहे. तर काहींनी त्यांच्या भांडवली वृत्तीवर टीकाही केली आहे.