S. Somanath : भारताची सौर मोहिम 'आदित्य एल 1’ (Aditya-L1) च्या वेळी लाँचिंगवेळीच भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ यांची कॅन्सरशी (Cancer) झुंज सुरु आहे. सोमनाथ (S. Somanath) यांनी एका मुलाखती दरम्यान, याबाबत माहिती दिली आहे. चंद्रयान 3 मोहिमेपासून त्यांना आरोग्यविषय समस्या सुरु झाल्या होत्या. मात्र, तेव्हा आपल्याला कर्करोग झालाय, याची त्यांना माहिती नव्हती. ते म्हणाले की, आदित्य एल 1 (Aditya-L1)च्या लाँचिंग दिवशी मला आजाराबाबत माहिती मिळाली. त्यामुळे एस सोमनाथ आणि त्यांचे कुटुंबिय चिंतेतं आहेत.
सोमनाथ यांना कॅन्सर झालाय, याची माहिती मिळाल्यानंतर इस्रोमधील त्यांच्या सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला होता. मात्र, अशा आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी स्वत:ला आणि सहकाऱ्यांना सावरले. चंद्रयान मोहिनंतर त्यांनी पोटाचे स्कॅनिंग केले. तेव्हा त्यांना कॅन्सर झाला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पुढील उपचार घेण्यासाठी ते चेन्नईत गेले. त्यांना हा आजार अनुवंशिकतेने झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यांना पोटाचा कॅन्सर झालाय.
कर्करोगाची झंज देत असतानाच कुटुंबिय आणि सहकाऱ्यांची साथ
काही दिवसांतचं त्यांना कोणता कॅन्सर झाला याची सर्व माहिती डॉक्टरांनी दिली. त्यानंतर एस. सोमनाथ यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बऱ्याच काळापासून त्यांच्यावर किमोथेरपी सुरु आहे. मात्र, त्यांचा आजार आता बरा झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कर्करोगाची झंज देत असतानाच कुटुंबिय आणि सहकाऱ्यांनी त्यांना साथ दिली असल्याचे सोमनाथ यांनी स्पष्ट केले.
वेळ लागेल पण मीच जिंकेन
मला माहिती आहे की, कॅन्सर पूर्णपणे बरा व्हायला बराच वेळ लागेल. ही एक मोठी प्रक्रिया आहे. मात्र, हा लढाई मी लढेन आणि जिंकेन सुद्धा असा विश्वास सोमनाथ यांनी व्यक्त केला. सध्या माझी बराच रिकव्हर झालो आहे. मी केवळ चार दिवस रुग्णालयात होतो. त्यानंतर मी माझे काम देखील पूर्ण केले. कोणताही वेदना होत नसताना मी इस्रोमध्ये 4 ते 5 दिवस काम करत होतो, असेही सोमनाथ यांनी नमूद केले.
इस्रोचे सर्व मिशन मी पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
मी अनेकदा स्कॅन केले, बऱ्याचदा मेडिकल चेकअप केले. अजूनही मी सातत्याने सर्व चेकअप करतोय. मात्र, सध्या मी पूर्णपणे बरा झालोय. माझं काम आणि इस्रोचे मिशन यावर मी पूर्णपणे लक्ष केंद्रीत केले आहे. इस्रोचे सर्व मिशन मी पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,असेही सोमनाथ यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या
फडणवीस साहेब आचारसंहितापूर्वी आरक्षण द्या,अन्यथा मराठा तुमचा सुपडासाफ करतील; जरांगेंचा इशारा