Cobra Warrior Exercise 2022 : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने ब्रिटनमध्ये होणाऱ्या कोब्रा वॉरियर्स सरावात (Cobra Warrior Exercise 2022) सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. युनायटेड किंगडममध्ये होणाऱ्या सरावात भारतीय वायुसेना सहभागी होणार नाही. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जगभरात तणावाचे वातावरण आहे. हेच लक्षात घेऊन केंद्र सरकराने हा निर्णय घेतला आहे.
भारताकडून एलसीए तेजस लढाऊ विमान होणार होते सहभागी
कोब्रा वॉरियर सरावात भारताकडून स्वदेशी फायटर जेट, एलसीए (LCA) तेजस पहिल्यांदाच सहभाग घेणार होता. या सरावासाठी भारतीय हवाई दलाची पाच एलसीए तेजस लढाऊ विमाने टेक ऑफ केल्यानंतर इंग्लंडमधील वॉडिंग्टन एअरबेसवर पोहोचली होती. हा सराव 6 मार्च ते 27 मार्च या कालावधीत होणार होता. मात्र भारताने आता यातून माघार घेतली आहे.
लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस (LCA Tejas) हे जगातील सर्वोत्तम हवाई दलाच्या फायटर जेट्ससह (Fighter Jet) कोब्रा वॉरियर सरावात भाग घेणार होते. या फायटर जेट्सची क्षमता दाखवण्यासाठी हे एक उत्तम मंच ठरणार होते. मात्र युक्रेनमधील युद्धानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारताने सध्यातरी यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवाई दलाने ट्विट केले की, "अलीकडील घडामोडी लक्षात घेता, भारतीय हवाई दलाने यूकेमध्ये कोब्रा वॉरियर सराव 2022 साठी आपली विमाने तैनात न करण्याचा निर्णय घेतला आहे."
कोब्रा वॉरियर्स सरावाचा काय आहे उद्देश
कोब्रा वॉरियर सराव हा सर्वात मोठा वार्षिक रॉयल एअर फोर्स सराव आहे. याचे उद्दिष्ट वैमानिक आणि इतर हवाई उड्डाण तज्ञ दोघांनाही कठीण हवाई मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षण देणे आहे. या सरावात एअरक्राफ्ट इंटरसेप्शन आणि मॉक डॉगफाइट्स आणि मॉक ग्राउंड हल्ले यासारख्या एअर-टू-एअर ऑपरेशन्सचा समावेश आहे. जेणेकरून हवाई दलाची क्षमता आणखीन विकसित करता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine Crisis : युक्रेनमधील अडकलेल्या भारतीयांसाठी एअर इंडियाच्या फ्लाइट्स, पुतिन यांच्याकडून भारतीयांच्या सुरक्षेचे आश्वासन
- Russia Ukraine Crisis : 1200 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांची माहिती
- Russia Ukraine War: 'मैं झुकेगा नही...', युक्रेनची रक्षा करण्यासाठी कीवमध्येच उभा; राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांचा व्हिडीओ व्हायरल