अब्रूनुकसानीचा खटला लढणार
- राहुल गांधींच्या वकिलांनी सांगितलं की, राहुल त्यांचे शब्द मागे घेणार नाहीत. शिवाय अब्रूनुकसानीच्या खटल्याचा सामना करण्यासाठी तयार आहेत.
- सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेला अब्रूनुकसानीचा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका राहुल गांधींनी मागे घेतली आहे. त्यामुळे आता ते कनिष्ठ कोर्टात लढणार आहेत.
- तर कनिष्ठ कोर्टात स्वत: हजर राहण्यातून सूट देण्यास सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना नकार दिला आहे.
गांधी हत्येला संघ नव्हे, त्यांच्याशी संबंधित लोक जबाबदारः राहुल गांधी
काय आहे वाद?
2014 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीतील सभेत महात्मा गांधींच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधींच्या या आरोपावर आक्षेप घेत, आरएसएसने त्यांच्याविरोधात कोर्टात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता.
गांधी हत्येला संघ नव्हे, संघाशी संबंधित लोक जबाबदारः राहुल
राहुल गांधीनी गांधी हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नाही तर संघाशी निगडीत काही लोकांवर आरोप केला होता, असं त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी काही दिवसांपूर्वी कोर्टात स्पष्ट केलं आहे.
त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर ही केस लढण्याचा काँग्रेसचा निर्धारही मावळल्यात जमा झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र सुप्रीम कोर्टातील आजच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधी अब्रूनुकसानीचा खटला लढणार आहेत.
संबंधित बातम्याः