प्रयागराज: देशात धर्मांतर आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीमुळे लोकसंख्येचं असंतुलन निर्माण होत असल्याचं आरएसएसचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी म्हटलंय. त्यामुळे धर्मांतरविरोधी कायद्याची सक्ती करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलंय. धर्मांतर रोखण्यासाठी कायदे बनवले गेले आहेत, पण त्यांची सक्ती करण्याची आवश्यकता असल्याचं होसबळे यांनी म्हटलंय. याशिवाय घरवापसीचे चांगले परिणाम समोर आल्याचंही होसबळे यांनी सांगितलं. धर्मांतर केलेल्यांना आरक्षणाची सुविधा मिळू नये अशी संघाची आधीपासून भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय.
दत्तात्रय होसबळे म्हणाले, घरवापसीचे चांगले परिणाम समोर आले आहेत. घर वापसी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) प्रयत्न आहे. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकालेल्या नागरिकांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासठी घर वापसी राबवण्यात येत आहे. धर्मांतर रोखण्यासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. मात्र या कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. उत्तरप्रदेश आणि इतर काही राज्यात कोणत्याही आमिषाने किंवा बळजबरीने धर्मांतर करण्यास मनाई आहे. तसेत आरक्षणासाठी धर्मांतर केलेल्यांना आरक्षणाची सुविधा मिळू नये अशी संघाची आधीपासून भूमिका आहे
होसबळे म्हणाले, धर्मांतरामुळे हिंदूंची संख्या कमी होत आहे आणि लोकसंख्येच्या असंतुलनामुळे अनेक देशांमध्ये विभाजनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. धर्मांतर आणि बांग्लादेशींच्या घुसखोरी लोकसंख्येच्या असंतुलनास जबाबदार आहे. त्यामुळे धर्मांतरविरोधी कायद्याची सक्ती करण्याची आवश्यकता आहे. लोकसंख्येच्या असंतुलनाचे दुसरे प्रमुख कारण घुसखोरी आहे. उत्तर बिहार, पूर्णिया, कटिहार सारख्या जिल्ह्यात तसेच अनेक राज्यांमध्ये बांग्लादेशीं घुसखोरांचे प्रमाण वाढत आहे.
आरएसएसचे प्रमख मोहन भागवत 16 ते 19 ऑक्टोबरपर्यंत प्रयागराजमध्ये आयोजित केलेल्या कार्यकरी मंडळाच्या बैठकीत सहभागी झाले आहेत. आरएसएसचे सरकार्यवाह बैठकीविषयी माहिती देताना दत्तात्रय होसबळे म्हणाले, चार दिवसाच्या या बैठकीत देशभरातील 372 कार्यकर्ता सहभागी झाले. वर्षभरात देशातील संघांच्या शाखांची संख्या वाढली असून सध्या संघांची संख्या 61,045 इतकी झाले आहे. गेल्या दोन वर्षात 3000 युवक संघाशी जोडले गेले आहेत. तसेच 2010-11 मध्ये सुरू केलेल्या 'जॉईन आरएसएस प्लॅटफॉर्म' या अभियानाद्वारे स्वेच्छेने शाखेत सहभागी होणाऱ्यांची संख्या 1,30,000 एवढी झाली आहे.
जिल्हा मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर असलेल्या यमुनापार गौहनिया येथील शाळेच्या परिसरात संबोधित करताना होसाबळे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंयसेवक संघ धर्मांतराबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. संघाच्या प्रयत्नांना यश देखील मिळत आहे.