Bihar Election Result 2025 : बिहार निवडणुकीच्या (Bihar Election) निकालानंतर राष्ट्रीय जनता दलच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहेच, पण दुसरीकडे यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या परिवारातही फूट पडल्याचं दिसून आलं. लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी आपण कटुंबाशी नातं तोडत असल्याचा दावा केला. तेजस्वी यादव (Tejashwi Yadav), संजय यादव (Sanjay Yadav) आणि रमीज (Rameez) यांनीच आपल्याला कुटुंबातून बाहेर काढल्याचा दावा त्यांनी केला. या तिघांचं जर नाव घेतलं तर तुम्हाला शिव्या दिल्या जातील, बदनाम केलं जाईल आणि चप्पलने मारलं जाईल असंही त्या संतापाने म्हणाल्या.
रोहिणीचा आचार्य यांचा संताप (Rohini Acharya News)
बिहार निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रोहिणी आचार्य यांनी कुटुंब सोडण्याचा निर्णय घेतला. 'माझा कुठलाही परिवार नाही. तुम्ही तेजस्वी, संजय आणि रमीजकडे जा. त्यांनीच मला कुटुंबातून बाहेर काढलं' असा दावा त्यांनी केला.
ते जबाबदारी घ्यायला तयार नाहीत (Leadership Accountability Issue)
रोहिणी आचार्य म्हणाल्या की, "पक्षाच्या पराभवाबाबत कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. पक्षाचा एवढा दारुण पराभव का झाला असं संपूर्ण देश आणि पक्षातील कार्यकर्ते त्यांना विचारत आहेत. स्वतःला चाणक्य म्हणवणाऱ्यांनाच हा प्रश्न विचारणार ना? कार्यकर्तेच त्यांनाच विचारतील ना? पण पराभवाची जबाबदाी कुणीही घ्यायला तयार नाही. कार्यकर्ते प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना धमकावलं जातं.”
संजय–रमीजचं नाव घेतलं की घरातून हाकललं जातं (Internal Conflict in RJD)
'संजय यादव आणि रमीजचं नाव घेतलं की घरातून काढून टाकतात, बेइज्जत करतात, शिव्या दिल्या जातात. इतकंच नव्हे तर चप्पलने मारलं जातं. पक्षात प्रश्न विचारण्याचीही मुभा नसलेली परिस्थिती आहे' असा दावा रोहिणी आचार्य यांनी केला.
यादव कुटुंबातील वाद उफाळला (RJD Family Rift After Defeat)
बिहार निवडणुकीत RJDला मोठा पराभव सहन करावा लागल्यानंतर पक्ष नेतृत्वावर आधीच प्रश्नचिन्हं निर्माण झाली होती. आता रोहिणी आचार्यांच्या या दाव्यामुळे लालू कुटुंबातील वाद अधिकच तीव्र झाला आहे. तेजस्वी-केंद्रित निर्णय शैली, सल्लागारांचा हस्तक्षेप आणि अंतर्गत गटबाजी हे मुद्दे आता खुलेपणे समोर येत आहेत.
ही बातमी वाचा: