अभिनेता रितेशनं अजयच्या कुत्र्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर ट्विटरवर धमाल
एबीपी माझा वेब टीम | 07 Feb 2019 12:34 PM (IST)
अभिनेता रितेश देशमुख आणि अजय देवगण यांच्यात सध्या ट्विटरवर धमाल सुरु आहे.
अभिनेता रितेश देशमुख आणि अजय देवगण यांच्यात सध्या ट्विटरवर धमाल सुरु आहे. या दोघांचे चाहते आणि ट्विटर फॉलोअर्स देखील यात सहभागी होत आनंद घेताना दिसत आहे. अभिनेता अजय देवगण गाडी किंवा घोड्याच्या वर उभा असल्याचे अनेक सिन्स आपण त्याच्या सिनेमात पाहिले असतील. त्याच्या या पोजवरुनच रितेशनं खेचण्याचा प्रयत्न केला आहे. रितेशनं नुकताच ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रस्त्यावरुन चाललेल्या एका रिक्षाच्या वर एक कुत्रा उभा आहे. या ट्विटमध्ये रितेशनं अजय देवगणला मेन्शन करुन "आत्ताच मला तुमचा कुत्रा दिसला" असं लिहीलं आहे. रितेशच्या या ट्विटला अजयनं देखील तसंच मिश्किल उत्तर दिलं आहे. अजयने एका पक्षाचा फोटो ट्विट करत "जसं की हा माझा पक्षी आहे", असं उत्तर दिलं आहे. अजयच्या या रिप्लाय नंतर ट्विटरवर अजयच्या प्राण्यांच्या फोटोंनी धुमाकुळ घातला आहे. दोन्ही पाय वेगवेगळ्या गोष्टींवर ठेवलेल्या बेडुक, खार, पोपट या प्राण्यांचे फोटो ट्विटरवर शेअर केले जात आहेत.