Rishikesh Train Accident : उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. सोमवारी रात्री सुमारे साडेनऊ वाजता योगनगरीत ऋषिकेश स्थानकावर उज्जयनी एक्सप्रेस (Ujjain Express) रुळावरून घसरली असून ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले. हा अपघात (Train Accident) इतका भीषण होता की, एक डबा पूर्णपणे रुळावरून घसरून, उलटला आणि सुमारे 20 फूट रुळांवर लटकला. रुळावरून घसरलेल्या ट्रेनची भयानक छायाचित्रेही आता समोर आली आहेत. यात देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना ट्रेन क्रमांक 143117 उज्जैनी एक्सप्रेसशी उज्जयनी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरून उलटले. सुदैवाने, यार्डमध्ये रुळ बदलले जात असताना आणि ट्रेन रिकामी असताना हा अपघात घडल्याने एक मोठी दुर्घटना टळली. सध्या रेल्वेने यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. (Rishikesh Train Accident)

Continues below advertisement

अपघात कसा झाला? (Rishikesh Train Accident)

प्राथमिक तपासानुसार, नियमित देखभालीदरम्यान ट्रेनचे ब्रेक निकामी झाले होते. ही ट्रेन आज (19 मे) सकाळी सुमारे 6 वाजता सुटणार होती. काल रात्री, सुमारे 9.23 वाजता, स्टेशन यार्डमध्ये ट्रेनचा ट्रॅक बदलला जात होता. यावेळीहाअपघातघडला. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये फक्त लोको पायलट उपस्थित होता. अपघातानंतर रुळांवर मोठी गर्दी जमली होती. जीआरपीच्या जवानांनी परिस्थितीचा ताबा घेतला आणि लोकांना घटनास्थळावरून हटवले. रेल्वे विभागाने चौकशी सुरू केली आहे. मात्र ट्रेनच्या संचालनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वरिष्ठ रेल्वे अधिकारी अडीच तास घटनास्थळी पोहोचले नाहीत, असा आरोप आहे.

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या रेल्वे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. रुळांवरून खराब झालेले डबे हटवण्याचे काम सध्या सुरू आहे. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गाडी रुळावरून घसरल्याची घटना कैद झाली आहे. या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे रेल्वेचे म्हणणे आहे.

तीन दिवसांत चार अपघात? (Train Accident)

हा असा पहिला अपघात नाही. गेल्या काही दिवसांत अनेक रेल्वे अपघात घडले असून, त्यामुळे रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी काल सकाळी, बिहारहून पाटणाकडे जाणाऱ्या एका पॅसेंजर ट्रेनला सासाराम रेल्वे स्थानकावर आग लागली होती. रविवार, 17 मे रोजी, पहाटे 5:30 च्या सुमारास आलोट आणि लुनीरिच्छा स्थानकांदरम्यान तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या बी1 एसी डब्याला अचानक आग लागली. याशिवाय, शुक्रवार, 15 मे रोजी, हैदराबादमधील नामपल्ली रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या हैदराबाद-जयपूर एक्सप्रेसच्या दोन रिकाम्या एसी डब्यांना (बी1 आणि बी2) आग लागली, ज्यात कोणीही जखमी झाले नाही.

इतरमहत्वाच्या बातम्या