Petrol Diesel price hike: पंतप्रधान नरेंद्र मोदी तमाम देशवासियांना आगामी काळात इंधनाचा वापर जपून करण्याचे कळकळीचे आवाहन केल्यानंतर अनेकांना भविष्यातील आर्थिक अरिष्टाची चाहूल लागली होती. ही भीती आता खरी ठरताना दिसत असून पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel Price) दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली होती. त्याला चार दिवस उलटत नाही तोच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Diesel rate) दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. देशातील प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वेगवेगळी वाढ झाली आहे. त्यानुसार दिल्लीत पेट्रोलच्या दरात 87 पैसे आणि डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107 रुपयांच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. तर डिझेल प्रतिलीटर 94 रुपयांच्या टप्प्याजवळ येऊन पोहोचले आहे. मंगळवारी सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत.

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे (Iran America War) आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच केंद्र सरकारने यापैकी काही भार सर्वसामान्यांवर टाकायचे ठरवले असून त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ झाली आहे. अवघ्या चार दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. (Petrol and Diesel today price)

आजचे महत्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर- (Petrol-Diesel Price Hike)

पेट्रोलचे नवे दर (Petrol Price)

Delhi      Rs 98.64 (+0.87)Kolkata    Rs 109.70 (+0.96 )Mumbai     Rs 107.59 (+0.91 )Chennai    Rs 104.49 (+0.82)

डिझेलचे नवे दर (Diesel Price)

Delhi       Rs 91.58 (+0.91)Kolkata     Rs 96.07 (+0.94)Mumbai      Rs 94.08 (+0.94)Chennai     Rs 96.11 (+0.86)

Maharashtra Petrol and Diesel rate: महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर किती?

Nagpur Petrol and Diesel rates

पेट्रोल 108.06डिझेल 94.63

Bhandara Petrol and Diesel rates

108.69 (पेट्रोल नवा दर)

95.24 (डिझेल नवा दर)

Pune Petrol and Diesel rates

Petrol- 107.86 (91 पैशांनी वाढ)

Disel -  94.40 (94पैशांनी वाढ )

Solapur Petrol and Diesel rates

पेट्रोल : 108.21डिझेल : 94.75

Nashik Petrol and Diesel rates

पेट्रोल : 108.84डिझेल : 95.35

Ratnagiri Petrol and Diesel rates

पेट्रोल - 109.53डिझेल - 96.06

Parbhani Petrol and Diesel rates

पेट्रोल:- १०९.४९ पैसे डिझेल:- ९५.९६ पैसे

Kolhapur Petrol and Diesel rates

पेट्रोल- 108.37डिझेल- 94.93

Buldhana Petrol Diesel Shortage: बुलढाण्यात इंधन टंचाईचा सहावा दिवस, शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर जागून रात्र काढली

बुलढाणा जिल्ह्यात अभtतपूर्व अशी इंधन टंचाई निर्माण झाली आहे आणि याचा फटका थेट आता शेतकऱ्यांना बसू लागला आहे. डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. लवकरच मान्सूनच आगमन होणार आहे व त्यापूर्वी शेतीची कामे आटोपून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागणार आहे. मात्र ट्रॅक्टर साठी डिझेल मिळत नसल्याने सहाव्या दिवशीही शेतकरी व वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर रांगेत रात्र काढली . मात्र तरीही डिझेल न मिळाल्याने अनेक शेतकरी संधप्त झाले आहेत. काल रात्री जिल्ह्यातील 166 पेट्रोल पंपांपैकी फक्त 22 पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध होतं मात्र प्रत्येक ठिकाणी मोठी रांग व गर्दी असल्याने अनेकांना डिझेल मिळू शकले नाही व त्यांचा नंबर येईपर्यंत डिझेल संपलं  यावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.

आणखी वाचा

Electricity Bill : सर्वसामान्यांना 420 व्होल्टचा झटका! फॅन-लाईट तर सोडाच, घर कायमचं बंद असलं तरी भरावं लागणार वीज बिल, 'हा' प्रस्ताव लागू झाला तर खिशाला भुर्डंद