Delhi New : सध्या देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना दिसत आहे. रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी कोरोनामुळे दररोज एक हजाराच्या पुढे मृत्यू होत आहेत. अशातच रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये निर्बंध शिथील होत आहेत. दिल्लीतही कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याने कोरोना निर्बंध शिथील केले आहेत. दिल्लीत टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  प्रथम 7 फेब्रुवारीपासून 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होणार आहेत. दरम्यान, लसीकरण न केलेल्या शिक्षकांना कामवार येण्यास मनाई केली आहे.


दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची (DDMA) शुक्रवारी कोरोनाच्या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये निर्बंध उठवण्याबाबत चर्चा झाली. कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस आणि जीम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, चारचाकी वाहनाचे चालक एकटे प्रवास करत असल्यास त्यांना मास्क घालण्यापासून सूट दिली जाईल. तसेच सर्व कार्यालये आता 100 टक्के उपस्थितीसह काम करू शकतात. तसेच नाईट कर्फ्यूच्य वेळमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. रात्री 11 च्या नंतर नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याआधी 10 च्या नंतर नाईट कर्फ्यू लागू होता. या निर्णयाचे तज्ज्ञांसह विविध उद्योजक, व्यवसायिकांनी स्वागत केले आहे.


कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांना मोठ्या संख्येने लसीकरण करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच सिनेमा, रेस्टॉरंट आणि बार यांना 50 टक्केच्या क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. शाळा सतत बंद केल्याने मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तसेच मुलांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कोरोनाच्या संकटामुळे दिल्लीत मार्च 2020 पासून बहुतांश शाळा बंद आहेत.


सफदरजंग हॉस्पिटलमधील सामुदायिक औषध विभागाचे प्रमुख डॉ. जुगल किशोर म्हणाले की, दिल्लीमध्ये कोविड पॉझिटीव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. देशभरात कोरोना रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. बहुतेक रुग्णांना सौम्य स्वरूपाची असल्याचे डॉ. जुगल म्हणाले. त्यामुळे सामान्य स्थिती पूर्ववत करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळा पुन्हा सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, सरकारच्या निर्बंध शिथील करण्याच्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी निर्बंध शिथील केल्याबद्दल डीडीएमएनचे स्वागत केले आहे. रात्रीचा कर्फ्यू उठवायला हवा होता जेणेकरून व्यावसायिक आस्थापनांना कामकाजासाठी अधिक वेळ मिळेल. जीम पुन्हा सुरू करण्यास परवानगी देणे ही चांगली गोष्ट आहे. या आस्थापनांशी संबंधित हजारो कामगार बेरोजगारीला सामोरे जात होत असेही ते म्हणाले. दिल्ली जीम असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, लॉकडाऊनमुळे जिम मालकांचे आधीच खूप आर्थिक नुकसान झाले आहे. सर्व जीम मालक कर्जबाजारी आहेत. डीडीएमएचा निर्णय जीम मालक आणि या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा असल्याचे असोसिएशनचे उपाध्यक्ष चिराग सेठी यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: