न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक?
विरल आचार्य अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये शिकवण्यासाठी जात असल्याचं कळतं. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या सॅटर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये ते प्राध्यापक म्हणून रुजू होणार आहे. त्यांचं कुटुंबही न्यूयॉर्कमध्येच राहतं.
सर्वात कमी वयाचे डेप्युटी गव्हर्नर
विरल आचार्य हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्वात कमी वयाचे डेप्युटी गव्हर्नर होते. 23 जानेवारी 2017 रोजी ते आरबीआयमध्ये रुजू झाले होते. डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांचा तीन वर्षांसाठी कार्यकाळ होता. मात्र तो पूर्ण व्हायच्या सहा महिने आधीच त्यांनी राजीनामा दिला.
आयआयटी मुंबईचे विद्यार्थी
विरल आचार्य आयआयटी मुंबईचे विद्यार्थी आहेत. त्यांनी 1995 मध्ये कम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली आहे. 2001 मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली. तर 2001 पासून 2008 पर्यंत ते लंडन बिझनेस स्कूलमध्ये शिकले.
विरल आचार्य अस्वस्थ?
आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी अचानक पद सोडल्याने विरल आचार्य काहीसे अस्वस्थ होते. मागील वर्षी 26 ऑक्टोबर रोजी आरबीआयच्या स्वायत्तता कायम ठेवण्याची आवश्यकता असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. तर मागील दोन पतधोरणात आर्थिक विकास आणि महागाई या दोन मुद्द्यांवर त्यांनी वेगळं मत मांडलं होतं. तसंच एमपीसीच्या बैठकीतही आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास आणि डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांच्या आर्थिक तूट आणि त्याचं योग्य आकलनाच्या मुद्द्यावर असहमती दाखवली होती.