लखनऊ : उत्तर प्रदेशच्या गोंडातील एका गावात घोडीवर स्वार झालेल्या नवरदेवाला घेऊन घोडीनं थेट विहिरीत उडी घेतली. नवरदेवाला दोरखंडाने बाहेर काढण्यात आलं. तर घोडीला जेसीबीच्या सहाय्यानं बाहेर काढलं. सुदैवाने नवरदेवाला कसलीही दुखापत झाली नाही.


उत्तर प्रदेशच्या गोंडीमध्ये लग्नापूर्वी नवरदेवाने घोडीस्वार होऊन विहिरीला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. त्यानुसार नवरदेव बाशिंग बांधून घोडीवर स्वार झाला. अन् नवरदेवाने घोडीवर बसून विहिरीला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली.

पण तितक्यात कुणीतरी फटाक्यांची माळ लावली, आणि फटाक्यांच्या आवाजानं घोडी बिथरली आणि नवरदेवाला घेऊन थेट विहिरीत उडी घेतली. या घटनेनंतर सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद एका क्षणात उडाला.

घोडीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशिनची मदत घेण्यात आली. तर नवरदेवाला दोरखंडाने बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने नवरदेवाला कसलीही दुखापत झाली नाही.