कानपूर : कलम 370 हटवणं हाचं जम्मू-काश्मीरच्या समस्यांवर उपाय असल्याचं मतं अभिनेते आणि भाजप समर्थक अनुपम खेर यांनी व्यक्त केलं आहे. कानपूरमधील एका कार्यक्रमात जम्मू-काश्मीरवर बोलत असताना त्यांनी वक्तव्य केलं आहे.


लोकसभेच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे संपूर्ण देश असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. नरेंद्र मोदी आणि सरकारच्या मागे संपूर्ण देश असल्याचं म्हणतं विरोधकांनी आता घाबरलं पाहिजे असल्यांच वक्तव्य अनुपम खेर यांनी केलं आहे. तसेचं विरोधकांनीसुद्धा असे काहीतरी केलं पाहिजे की त्यांनासुद्धा लाखो लोक पाठिंबा देतील.

VIDEO | हरियाणात प्रचार करताना अनुपम खेर यांची गोची | चंदीगढ | एबीपी माझा



रविवारी कानपूरमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील कार्यक्रमाताल अभिनेते अनुपम खेर उपस्थित होते. या निवडणुकीत जनतेने घराणेशाहीला नाकारत मोदींना मतदान केलं आहे. जनतेने मोदींचे कौतुक केल्याचंही खेर म्हणाले. आपण ज्या लोकशाहीचा उत्सव साजरा केला आहे तसेच आता आपण सरकारला साथ देत देशाच्या पाठिंब्यासाठी सहकार्य करु असेही अनुपम खेर म्हणाले.

माझी पत्नी खासदार असून कुटुंबातील एक सभासद राजकारणात असल्याचं पुरेसे आहे असं मतं अनुपम खेर यांनी व्यक्त केलं आहे. तसेच मला राजकारणात जाण्याची अद्याप गरज वाटतं नाही आणि जेव्हा मी राजकारणात येईन तेव्हा प्रथम मी माध्यमांशी येऊन संवाद साधून याची माहिती देईन असं अनुपम खेर म्हणाले.

VIDEO | मुंबई : अभिनेते अनुपम खेर यांच्यासह दिग्गज नेत्यांचंही ट्विटर हँडल हॅक