चंदीगढ : पंजाबमध्ये आलेल्या विनाशकारी पुराच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सने तातडीने दहा मुद्द्यांचा मानवतावादी आराखडा जाहीर केला आहे. राज्य प्रशासन, पंचायत संस्था आणि स्थानिक भागीदारांसोबत मिळून रिलायन्सच्या टीम्स अमृतसर आणि सुलतानपूर लोधीतील सर्वाधिक प्रभावित गावांमध्ये मदत पोहोचवत आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी म्हणाले, “या कठीण प्रसंगात पंजाबच्या जनतेसोबत आम्ही आहोत. अनेक कुटुंबांचे घर, उपजीविका आणि सुरक्षिततेची भावना हरवली आहे. संपूर्ण रिलायन्स परिवार त्यांच्या सोबत उभा आहे. अन्न, पाणी, निवारा किट्स तसेच माणसांसह जनावरांचीही काळजी घेत आहे. हा दहा मुद्द्यांचा आराखडा आमच्या ‘We Care’ या मूल्यांवर आधारित आहे. पंजाबच्या या संघर्षाच्या काळात आम्ही खांद्याला खांदा लावून उभे आहोत.”
प्रत्यक्ष मदतकार्य : दहा मुद्द्यांचा आराखडा
पोषण सहाय्य
10,000 सर्वाधिक प्रभावित कुटुंबांसाठी अत्यावश्यक कोरड्या अन्नधान्याचे रेशन किट.
1,000 दुर्बल कुटुंबांसाठी (विशेषतः विधवा महिला आणि वयोवृद्धांचे नेतृत्व असलेली कुटुंबे) प्रत्येकी ₹5,000 किमतीची व्हाउचर सहाय्य योजना.
सामुदायिक स्वयंपाकगृहांना कोरडे रेशन पुरवठा.
पाणथळ भागात सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी पोर्टेबल वॉटर फिल्टरची स्थापना.
निवारा सहाय्य
विस्थापित कुटुंबांसाठी ताडपत्री, चटई, डासजाळी, दोर, बिछाना आदींचा आपत्कालीन निवारा किट.
सार्वजनिक आरोग्य जोखीम व्यवस्थापन (PHRM)
पुरानंतर साथीचे आजार टाळण्यासाठी आरोग्य जागरुकता सत्रे व जलस्रोतांची निर्जंतुकीकरण मोहीम.
प्रत्येक प्रभावित घरासाठी स्वच्छता किटचे वितरण.
जनावरांची मदत (Livestock Support)
पाणथळामुळे जनावरांना पुराचा मोठा फटका बसला आहे. त्यांच्यासाठी तातडीची काळजी.
रिलायन्स फाऊंडेशन आणि वनतारा यांनी प्राणी संवर्धन विभागासोबत मिळून औषधे, लस व उपचारांसाठी जनावरांचे कॅम्प सुरू केले.
जवळपास 5,000 गुरांसाठी 3,000 सायलेज बंडल वितरित.
वनताराच्या 50+ तज्ज्ञांची टीम आधुनिक उपकरणांसह बचाव कार्यात गुंतली आहे. वाचवलेल्या प्राण्यांचे उपचार, मृत जनावरांचे सन्मानपूर्वक वैज्ञानिक अंत्यसंस्कार व संभाव्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने केली जात आहे.
सततचे समन्वय आणि मदत
रिलायन्स टीम्स जिल्हा प्रशासन, प्राणी संवर्धन विभाग आणि स्थानिक पंचायतांसोबत 24 तास काम करत आहेत. अल्पकालीन मदतीसोबत मध्यमकालीन पुनर्वसनाची तयारीही सुरू आहे. जिओ पंजाब टीमने एनडीआरएफसोबत काम करत पूरग्रस्त भागात नेटवर्क पुनर्संचयित केले असून राज्यभर 100% विश्वसनीय कनेक्टिव्हिटी सुनिश्चित केली आहे.
रिलायन्स रिटेल टीम, रिलायन्स फाऊंडेशन आणि स्वयंसेवक यांच्या मदतीने पंचायतांच्या माध्यमातून ओळखलेल्या सर्वाधिक प्रभावित कुटुंबांना 21 आवश्यक वस्तूंचा समावेश असलेले कोरडे रेशन आणि स्वच्छता किट पाठवले जात आहेत.
एकत्रित मदतीची हमी
या आपत्तीच्या क्षणी रिलायन्स पंजाबसोबत खांद्याला खांदा लावून उभे आहे. सामूहिक कृती, काळजी आणि सहानुभूतीच्या माध्यमातून पंजाबचे जलद, सर्वसमावेशक पुनर्वसन व्हावे आणि राज्य अधिक बळकट व्हावे, यासाठी रिलायन्स कटीबद्ध आहे.
रिलायन्स फाऊंडेशनबद्दल माहिती
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची परोपकारी शाखा रिलायन्स फाऊंडेशन देशातील विकास आव्हानांवर नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उपाय शोधण्याचे काम करते. संस्थापक आणि अध्यक्षा श्रीमती नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली फाऊंडेशन ग्रामीण परिवर्तन, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, शहरी पुनरुत्थान, कला-संस्कृती व वारसा संवर्धन या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. आतापर्यंत फाऊंडेशनने भारतभरातील 91,500 पेक्षा अधिक खेडी व शहरी भागातील 8.7 कोटींहून अधिक लोकांचे जीवन स्पर्शिले आहे.
अधिक माहितीसाठी : www.reliancefoundation.org
सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी :
X: https://x.com/ril_foundation
Facebook: https://www.facebook.com/foundationRIL
LinkedIn: https://in.linkedin.com/company/reliancefoundation
Instagram: https://www.instagram.com/reliancefoundation/
YouTube: https://www.youtube.com/@RelianceFoundationTV