नवी दिल्ली: सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. रिलायन्सच्या शेअर्सच्या भावात घसरण होऊन ते 1890 रुपये इतके खाली आले. दुसऱ्या तिमाहीच्या परिणामांनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाल्याची पहायला मिळाले.


सोमवारच्या या घसरणीमुळे रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना तब्बल एक लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. शुक्रवारी रिलायन्सच्या संपत्तीची किंमत 13,89,159.20 कोटी रुपये इतकी होती. त्यात आता 1.12 लाख कोटींची घरसण होऊन ती आता 12,77,991.30 रुपयांवर पोहचली आहे.


रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये त्यांच्या प्रमोटर्सचा हिस्सा हा 50.49 टक्के इतका आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत आता जवळपास 55 हजार कोटींची घसरण झाली असून रिटेल गुंतवणूकदारांनाही 8,200 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.


सोमवार संध्याकाळपर्यंत रिलायन्सच्या शेअर्समध्ये 8.62 टक्क्यांची घट नोंदवली गेली आणि त्याचे भाव 1,877.30 रुपयांवर आले. शुक्रवारी कंपनीने सप्टेंबरच्या तिमाहीचे परिणाम सादर केले गेले ज्यामध्ये कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये 15 टक्क्यांची घसरण नोंदवली गेल्याचे स्पष्ट झाली आणि 9,567 कोटींचा तोटा झाला. त्याचाच परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झाला असून त्यामध्ये मोठी घसरण झाली.


काही विश्लेषकांच्या मते हे शेअर्स अजून घसरण्याचा अंदाज आहे तर काहींच्या मते पुन्हा या शेअर्सच्या भावात तेजी येण्याची शक्यता आहे.


मुकेश अंबानींची श्रीमंतांच्या यादीत चार स्थानाने घसरण
रिलायंसच्या शेअर घसरणीचा परिणाम मुकेश अंबांनींच्या संपत्तीवरही झाला असून त्यांची जागतिक श्रीमंतांच्या यादीत चार स्थानाने घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्सच्या अहवालानुसार मुकेश अंबानींच्या संपत्तीत 7 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे आणि ती आता 71 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. फोर्ब्स रियल टाइम बिलेनियर यादीत मुकेश अंबानी याआधी 6 व्या क्रमांकावर होते. आता त्यांची 9 व्या स्थानावर घसरण झाली आहे. संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानी आता गुगलचे संस्थापक लॅरी पेज यांच्या खाली ढकलले गेले आहेत. या वर्षी जुलैमध्ये मुकेश अंबानी जागतिक श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहचले होते.


महत्वाच्या बातम्या:



मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलला जोरदार झटका, फ्यूचर ग्रुपसोबतचा करार रोखला!


जियोकडून 5G तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी; भारतात लवकरच होणार लॉन्च


टेलिकॉमनंतर रिटेल, होलसेल क्षेत्रात रिलायन्सचा दबदबा! बिग बझारची मालकी आता मुकेश अंबानींकडे


रिलायन्स जियोची टिकटॉकमध्ये गुंतवणूक?; अधिकाऱ्यांसोबत बोलणी झाल्याची चर्चा