मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकारी पदाच्या (श्रेणी-ब) तब्बल 182 जागा भरण्यात येणार आहेत. 'महान्यूज'ने याबाबतची बातमी दिली आहे.


 

या थेट भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

ग्रेड बी मधील इकॉनॉमिक अँड पॉलिसी रिसर्च या पदासाठी 11, स्टॅटिस्टिक अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट या पदासाठी 8 जागा भरण्यात येणार आहेत.

 

अधिक माहिती - https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=3214  

 

तर ग्रेड बी अधिकारीपदासाठी 163 जागा भरण्यात येणार आहेत.

 

अधिक माहिती - https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=3212