नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या उरलेल्या 18 दिवसात गीतेचे 18 अध्याय वाचून काढा, असा सल्ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलाय. मी देखील माझ्या कुटुंबासोबत गीता पठन सुरू केल्याचंही त्यांनी सांगितले. कोरोना संकटामुळे देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे आता 18 दिवस उरले आहेत. त्यामुळे वेळेचा सदउपयोग करत या उर्वरित दिवसांध्ये ज्यांची इच्छा आहे, अशांनी गीता पठन करावे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संदर्भात व्हिडीओ अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.





कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील नागरिकांना या काळात गीता पठन करण्याचा सल्ला दिला आहे. केजरीवाल बोलताना म्हणाले, "21 दिवसांचा लॉडाऊन आहे. या काळात तुम्हाला आपल्या घरात राहयचे आहे. आपली सर्वात मोठी ताकद देशभक्ती आहे. जर तुम्ही खरे देशभक्त आहात तर तुम्ही घरात राहायला हवे. सध्याच्या परिस्थितीत हीच देशभक्ती आहे. जर तुम्हाला चांगले वाटत असेल तर गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि 18 दिवसचं लॉकडाऊनचे राहिले आहेत. मी, माझी पत्नी आणि कुटुंबाने काल शनिवारपासून घरात गीता पठन घरात सुरू केले आहेत. आम्ही सर्वजण मिळून रोज एक अध्याय वाचतो. याला केवळ अर्धा तास लागतो. लॉकडाऊनचेही 18 दिवस बाकी राहिलेत. त्यामुळे तुमची इच्छा असेल तर उर्वरित दिवसता तुम्ही गीता पठन करू शकता. यावेळेचा तुम्हीही सदउपयोग करू शकता.


Coronavirus | उपाशी मुलांच्या काळजीने दोन दिवसांपासून दाम्पत्याची पायपीट


देशात कोरोना संक्रमितांची संख्या वाढतेय
देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आज घडीला देशात 1127 लोकांनी कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रात 203 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, त्याखालोखाल केरळमध्ये 202 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची बाधा झाल्याने आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 90 जणांनी कोरोना विरोधातली लढाई जिंकली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केलं आहे. मात्र, दिल्लीतील एका बसस्टँडवर काल शनिवारी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. बिहार, उत्तर प्रदेश मधून आलेले हजारो कामगार याठिकाणी घरी जाण्यासाठी आले होते. परिमाणी सोशल डिस्टन्सिंग कशी पाळली जाईल, असा प्रश्न विचारला जात आहे.


Corona Update | संचारबंदीच्या काळातही मुंबईतील डोंगरी भागात गर्दी, सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी