मुंबई: मोबाईल नंबर ज्याप्रमाणे पोर्टेबल करता येतो. त्याचप्रमाणे आता बँक अकाउंटही नंबर पोर्टेबिलिटी करता येऊ शकतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं हा प्रस्ताव ठेवला आहे. डेप्युटी गर्व्हनर एस एस मुंद्रा यांनी याबाबत  माहिती दिली.

एस एस मुंद्रा यांनी सांगितलं की, बँक खातं आधारकार्डशी लिंक केल्यानंतर पार्टेबिलिट करणं शक्य आहे. त्यामुळे तुमचं खातं एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पोर्टबल करणं सहज शक्य आहे. यामुळे अनेक ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

उदा. तुमचं कॅनरा बँकेत एक अकाउंट आहे. पण तुम्हाला तुमचं हे अकाउंट एसबीआय (SBI) मध्ये हवं असल्यास तुम्ही ते पोर्टेबिलिटीनं करता येणार आहे. तुमचा कॅनरा बँकेतील अकाउंटनंबर तुम्हाला एसबीआयमध्ये मिळेल. म्हणजेच तुमची बँक बदेलल पण तुमचा अकाउंट नंबर तोच राहिल.

मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात हे बदल करता येणं शक्य असल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे.
बँक अकाउंट पोर्टेबिलिटीचा फायदा

जर आपण आपल्या बँकेकडून मिळणाऱ्या सेवांपासून खूश नसल्यास तर आपण आपला बँक अकाउंट नंबर न बदलता आपली बँक बदलू शकता. त्यामुळे बँक जरी बदलली तरी तुम्हाला नवा अकाउंट नंबर घेण्याची गरज नाही. यामुळे तुम्हाला एकाहून अधिक बँक खाती संभाळत बसावी लागणार नाहीत. अशाप्रकारचे सेवा अस्तित्वात आल्यास याचा बँकांवर नक्कीच परिणाम होईल.

आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी बँकांना चांगल्या सुविधा द्यावा लागतील. जेणेकरुन ग्राहक आपली बँक बदलणार नाही.

पोर्टेबिलिटीसाठी बँका होणार तयार?
बँक अकाउंट नंबरला पोर्टेबिलिटी देणं सोपं काम नाही. यासाठी बँकांना आपला डेटा ऑनलाइन आणावा लागेल. तसेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं अधिक सक्षम व्हावं लागेल. त्यामुळे बँका हा प्रस्ताव स्वीकारतील का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँक खात्यांविषयी एक नवा प्रस्ताव मांडला आहे. मोबाइल नंबबर पोर्टेबिलिटी प्रमाणे बँक अकाउंट नंबर पोर्टेबल करता यावं असा प्रस्ताव मांडला आहे.