Ram Mandir LIVE | श्री रामाचं मंदिर हे आधुनिक संस्कृतीचं प्रतीक बनेल : नरेंद्र मोदी

Ram Mandir Bhumi Pujan LIVE Updates: अयोध्येत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आला आहे. राममंदिर भूमीपूजनाचे क्षणाक्षणाचे अपडेट पाहा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Aug 2020 02:07 PM
मला विश्वास आहे की, श्रीरामाच्या नावाप्रमाणेच अयोध्येत बनणारं भव्य राम मंदिर भारतीय संस्कृतीच्या वारशाचे द्योतक असेल. इथे बनणारं राम मंदिर अनंतकाळापर्यंत मानवतेसाठी प्रेरणादायी असेल : नरेंद्र मोदी
अनेक वर्ष टेंटखाली राहिलेल्या रामलला यांच्यासाठी आता एक भव्य मंदिराची निर्मिती होणार आहे : नरेंद्र मोदी
कोरोनाच्या संकटकाळात मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मर्यादा आल्या आहेत. प्रभू श्रीरामाच्या कामात जी मर्यादा अपेक्षित असते त्या मर्यादेचं दर्शन या कार्यक्रमात दिसत आहे. कोर्टाच्या निकालानंतरही मर्यादा देशामध्ये दिसली : नरेंद्र मोदी
राम मंदिराच्या निर्माणाची ही प्रक्रिया देशाला जोडण्याचा उपक्रम आहे : नरेंद्र मोदी
राम मंदिरासाठी अनेक पिढ्यांनी आयुष्य अर्पण केलं : पंतप्रधान नरेंद्र मोदी
श्री रामाचं मंदिर हे आधुनिक संस्कृतीचं प्रतीक बनेल. मी जाणीवपूर्वक आज आधुनिक या शब्दाचा उल्लेख करतोय : नरेंद्र मोदी
राम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात समर्पण, त्याग, संघर्ष, संकल्प होता. ज्याच्या त्याग, बलिदान आणि संघर्षाने आज हे स्वप्न साकार होत आहे, त्या सगळ्यांना मी नमन करतो, वंदन करतो : नरेंद्र मोदी
ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाल्याचा अभिमान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
शरयू नदीच्या काठावर सुवर्ण इतिहास लिहिला गेलाय : पंतप्रधान नरेंद्र मोदी
आज श्रीरामाचा जयघोष केवळ सिया-रामाच्या भूमीतच नाही तर संपूर्ण जगभरात घुमत आहे. सर्व देशावासियांना, जगभरातील राम भक्तांना आजच्या आनंदाच्या क्षणी कोटी कोटी शुभेच्छा : नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन सुरु, "सियावर रामचंद्र की..." जयघोष करत भाषणाला सुरुवात
राम मंदिराच्या टपाल तिकीटाचं नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण
राम मंदिराच्या टपाल तिकीटाचं नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण
आजचा दिवस अतिशय आनंदाचा, गेल्या 30 वर्षांच्या कठोर मेहनतीचं फळ मिळालं : मोहन भागवत
आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा : सरसंघचालक मोहन भागवत
गेल्या 500 वर्षांपासूनच्या स्वप्नाची पूर्तता : योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं संबोधन सुरु, योगी म्हणाले की, 135 कोटी भारतवासियांसाठी आणि जगातील अनेक हिंदूंच्या भावनांना पूर्ण करणारे पहिले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. या राममंदिर आंदोलनासाठी अनेक वीरांनी बलिदान दिलंय, त्यांच्या बलिदानामुळंच आपण आज हा दिवस पाहू शकलो.
अयोध्येत भक्तिमय वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न
अयोध्येत भक्तिमय वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न
अयोध्येत भक्तिमय वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न
सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत राम मंदिर भूमिपूजनाच्या मुख्य पूजेला सुरुवात, पंतप्रधानांसह मोजक्याच लोकांची उपस्थिती
सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत राम मंदिर भूमिपूजनाच्या मुख्य पूजेला सुरुवात, पंतप्रधानांसह मोजक्याच लोकांची उपस्थिती
12 वाजून 44 मिनिटे आठ सकंदांपासून 12 वाजून 44 मिनिटे आणि 40 सेकंद हा 32 सेकंदाचा मुहूर्त अतिशय शुभ, मोदी याच वेळात भूमिपूजन करणार
राममंदिराचा भूमिपूजन सोहळा सुरु, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत मुख्य पूजेला सुरुवात, पंतप्रधानांसह काहीच लोकांची उपस्थिती
राममंदिराचा भूमिपूजन सोहळा अवघ्या काही क्षणात सुरु होणार, पायाभरणीसाठी पाया खोदण्यासाठी चांदीचं फावडं, तर चांदीची वीट
पंतप्रधानांनी पारिजातकाचं वृक्षारोपण केलं, इथून पंतप्रधान भूमीपूजन स्थळी जाणार, काही वेळातच ते रामजन्मभूमीस्थळी पोहोचतील.
पंतप्रधानांनी हनुमानगढीत चांदीचा मुकुट अर्पण केला. एक प्रदक्षणा पूर्ण केली. त्यांनी साष्टांग दंडवत घालत दर्शन घेतलं. काही वेळातच ते रामजन्मभूमीस्थळी पोहोचतील.
शंखनादाने राम जन्मभूमी परिसर दुमदुमला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलं रामललाचं दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचले, काही वेळात नरेंद्र मोदी हनुमानगढीला पोहोचतील, हनुमानगढीमध्ये दर्शन आणि पूजा करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 28 वर्षानंतर अयोध्या पोहोचले. याआधी ते 1992 मध्ये ते अयोध्येला आले आहेत. त्यावेळी ते राम मंदिर आंदोलनासाठी आले होते. आज ते पंतप्रधान अयोध्येत राममंदिर भूमीपूजनाला आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 28 वर्षानंतर अयोध्या पोहोचले. याआधी ते 1992 मध्ये ते अयोध्येला आले आहेत. त्यावेळी ते राम मंदिर आंदोलनासाठी आले होते. आज ते पंतप्रधान अयोध्येत राममंदिर भूमीपूजनाला आले.
'रामायण' या गाजलेल्या मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी ट्विटरवर एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, 'अयोध्येत राम मंदिरासाठी गेली अनेक वर्ष सातत्यानं संघर्ष करणाऱ्या वरिष्ठ आणि त्यांचा संघर्ष भूमिपूजनापर्यंत घेऊन जाणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा कोटी कोटी प्रणाम. तुम्हा सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळेच आम्हाला हा दिवस पाहण्याचं सौभाग्य मिळत आहे. जय श्रीराम'

पंतप्रधान मोदी हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरने अयोध्येत दाखल, साकेत महाविद्यालयाच्या पटांगणात तयार केलेल्या हेलिपॅडवर लॅण्डिंग, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मोदींच्या स्वागताला हजर
80च्या दशकात 'रामायण' या गाजलेल्या मालिकेतील सीतेची भूमिका साकरणाऱ्या दीपिका चिखलिया यांना राम मंदिर भूमिपूजनाची प्रतिक्षा आहे. कोरोनाच्या प्रादर्भावामुळे राम मंदिर भूमिपूजनाला उपस्थित राहायला न मिळाल्याची खंत अभिनेत्रीला वाटत आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत म्हणाल्या आहेत की, 'रामललाच्या घरी परतण्याची वाट पाहत आहे.'


भगवान श्रीराम भारतीय इतिहास, संस्कृती आणि आपल्या आस्थेचं प्रतीक, आज प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा दिवस, अनेक वर्षांपासूनचं आपलं स्वप्न पूर्ण, आज त्या सर्वांचं स्मरण करतो ज्यांनी देशात राम जन्मभूमी आंदोलनाची सुरुवात केली, बलिदान दिलं, मी त्यांना अभिवदन करतो- नितीन गडकरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौमध्ये दाखल, आता हेलिकॉप्टरने अयोध्येसाठी रवाना होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौमध्ये दाखल, काही वेळात अयोध्येसाठी रवाना होणार
राममंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीवरुन लखनऊसाठी रवाना, पालम विमानतळावरुन मोदी रवाना झाल्याची पीएमओची माहिती
प्रभु श्रीरामचंद्राची जन्मभूमी #अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या शिलान्यास सोहळ्यानिमित्त तमाम देशवासियांना मंगलमय शुभेच्छा, मंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्वीट

रोहित पवार यांचं भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर ट्वीट, रोहित पवार यात म्हणतात, रामप्रहरापासून आपला दिवस सुरू होतो. जय जय राम कृष्ण हरी हा जगण्याचा मंत्र असतो. रामराम ही एकमेकांच्या ओळखीची खुण असते. साने गुरूजी म्हणायचे, 'रामराम म्हणताना तू ही राम आणि मी ही राम हे अपेक्षित असतं'. आपण पिढ्यान् पिढ्या असेच वागत आलो आहोत. राम आपला एकट्याचा नव्हता, तर तो सगळ्यांचा होता आणि राहणार. शेवटचा श्वास घेताना राम म्हणणाऱ्या गांधींजींचा राम, वारकऱ्यांना सामाजिक समता शिकवणारे ज्ञानदेव तुकाराम. आपल्याच शेतात अयोध्या समजून शेतात राबणारा एखादा सखाराम. राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे.
रामाने राम सेतू बांधला आपण प्रभू श्रीरामाचे विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया. जाती धर्माच्या बाबतीत भल्या भल्या पुरुषांच्या मर्यादा दिसून येतात निदान मर्यादापुरुषोत्तम रामाच्या बाबतीत असं होऊ नये.
आजच्या या दिवशी श्रीरामाला एकच प्रार्थना, सबकों सन्मती दे भगवान!!!

रामकृष्णहरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी राममंदिर भूमीपूजन सोहळ्यासाठी लखनौमध्ये दाखल, हेलिकॉप्टरने अयोध्येला रवाना होणार
नाशिक: भाजप आमदार देवयानी फरांदे, आमदर राहुल ढिकले गोदावरी काठावर दाखल, रामकुंडावर जलपूजनाला सुरवात, स्थानिक पुरोहित आणि भाजप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत धार्मिक पूजनला सुरवात
आज अयोध्येमध्ये राममंदिराचं भूमीपूजन होतं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येत पोहोचले

पार्श्वभूमी

अयोध्या : अयोध्येत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आला आहे.  अयोध्येच्या चौकाचौकात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राममंदिराच्या या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झाले आहेत. आज भूमीपूजनाचा सोहळा तर होईलच मात्र राममंदिराचं काम कधी पूर्ण होईल, याची उत्सुकता आता भक्तांना लागली आहे. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी श्री राम जन्मभूमि तीर्थ ट्रस्टचे ट्रस्टी स्वामी परमानंद महाराज यांच्याशी एबीपी न्यूजने संवाद साधला.

यावेळी स्वामी परमानंद महाराज यांनी सांगितलं की, लवकरात लवकर मंदिराचं निर्माण पूर्ण केलं जाईल. भूमीपूजनानंतर लगेचच मंदिर निर्माणाचं काम सुरु होईल.  ट्रस्टकडून मंदिर निर्माण करणाऱ्या कंपनीला मंदिराचं पूर्ण निर्माण करण्यासाठी पुढच्या 32 महिन्यांना वेळ दिला आहे. म्हणजे 2 वर्ष आणि आठ महिन्यात मंदिराचं निर्माण पूर्ण होऊ शकतं.  परमानंद महाराज म्हणाले की, देशात ज्या ज्या ठिकाणी शिला पूजन केलं आहे. त्या सर्व शिलांचा वापर राम मंदिर निर्माणासाठी केला जाणार आहे.

ऐतिहासिक राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आला आहे. काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भूमीपूजनाच्या जागेसह अन्य भागाची पाहणी केली तसेच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा देखील घेतला. अयोध्येच्या चौकाचौकात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राममंदिराच्या या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झाले आहेत. अयोध्यानगरीत दाखल होताच भक्ताचं लक्ष विविध चित्र आणि होर्डिंगनं आकर्षित होत. संपूर्ण शहरात प्रभू श्री रामाच्या जीवनाशी संबंधित वेगवेगळी कलाकृती साकरण्यात करण्यात आली आहे. अयोध्येतल्या अनेक भिंतीवर मोठमोठे चित्रही काढण्यात आली आहे. मोठे शहरातील मोठे पूल, उद्याने आणि बऱ्याचं महत्त्वाच्या ठिकाणांची दुरुस्ती करण्यात आली आहे. या सगळ्याचा आढावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला.

गणेश पूजन संपन्न

प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाच्या कार्यक्रमाला कालपासून सुरुवात झाली आहे. काल सकाळी या मंदिराच्या ठिकाणी गणेश पूजन पार पाडलं. सकाळी 9 वाजता सुरु झालेलं हे पूजन दुपारी 1 वाजता संपन्न झालं. हिंदू धर्मात कुठल्याही शुभकार्यााआधी गणेशाची पूजा केली जाते त्याप्रमाणे हा सोहळा संपन्न झाला.  तिनही दिवसांच्या कार्यक्रमांसाठी मोजकेच पुजारी नेमण्यात आले आहेत आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत .

अयोध्येच्या नाक्या- नाक्यावर पोलिस तैनात

अयोध्यानगरी पंतप्रधान नरेद्र मोदींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पंतप्रधान नरेद्र मोदी येण्याच्या एक दिवस आधी अयोध्येला लागून असलेल्या सर्व सीमा बंद करण्यात येणार आहेत. जे छोटे मोटे मार्ग आहेत त्याठिकाणी बॅरिकेटींग लाऊन तपासणी सुरु ठेवण्यात येणार आहे. अयोध्याच्या शेजारील जनपद बस्ती, गोंडा, आंबेडकरनगर, बाराबंकी, सुलतानपुर, अमेठी या शहरांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अयोध्येत शरयू नदीच्या माध्यामातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उत्तर प्रदेश सराकरची जलसेना तैनात करण्यात आली आहे. सीसीटीव्ही, राखीव दल, वाहतुक पोलिसांच्या तुकड्या रस्त्यारस्त्यावर तैनात करण्यात आल्या आहेत.

अयोध्येच्या लोकांमध्ये उत्साह

आपण जशी दिवाळी साजरी करतो तसं सध्या अयोध्येत वातावरण पाहायला मिळतंय. घरांना रंगेबीरंग कलर, साफसफाई, दुकानांमध्ये गर्दी तसेच प्रत्येक जण या भूमिपूजनाच्या मुर्हुतावर आनंद साजरा करण्यासाठी मिठाईच्या दुकानांकडे रांग लावतोय. अयोध्येत पंतप्रधान नरेद्र मोदींच्या पोस्टरबरोबर सगळीकडे भगवे झेंडे फडकताना दिसत आहेत. तसेच जो तो रामभक्त आपल्या गाडीवर किंवा घरावर प्रभू रामचं, हनुमानाचं चित्र असलेला झेंडा लावताना मग्न आहे.

मंचावर पंतप्रधान मोदी यांच्यासह केवळ पाच जणच

सोहळ्यात मुख्य मंचावर पंतप्रधान मोदी यांच्यासह केवळ पाच जणच उपस्थित राहतील, अशी माहिती मिळाली आहे. या मुख्य भूमिपूजन सोहळ्या मंचावर केवळ पाच मान्यवर असतील. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राममंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास हे उपस्थित असतील.

पहिलं निमंत्रण अयोध्या प्रकरणात मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारी यांना

राम मंदिर भूमीपूजनाचं पहिलं निमंत्रण अयोध्या प्रकरणात मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारी यांना पाठवण्यात आलं आहे. त्यांना हे आमंत्रण राम मंदिर ट्रस्टचे महंत चंपत राय यांच्यातर्फे पाठवण्यात आलं आहे. इक्बाल अंसारी यांच्यासह मुस्लिम पक्षकार  हाजी महबूब यांना देखील निमंत्रण दिलं आहे. तसंच बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करणारे पद्मश्री मुहम्मद शरीफ यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे.

भूमिपूजनाला उपस्थित मान्यवरांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावं नाहीत


Exclusive | राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रम कसा असणार? किती जण उपस्थित राहणार?

शरयू नदीच्या काठावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन

सकाळी राम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर रात्री शरयू नदीच्या काठावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संपूर्ण सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्येत मोठं मोठे कटआऊट लावण्यात येणार आहेत. हा संपूर्ण सोहळा ऐतिहासिक सोहळा करण्यासाठी आता भाजपकडून मोठया प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत.


हे ही वाचा- 


 


Ram Mandir | राममंदिर भूमिपूजनाला योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाही


 


राम मंदिर निर्माणासाठी महाराष्ट्रातून पहिली वीट कोणी पाठवली? 


 


भूमिपूजनाला उपस्थित मान्यवरांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावं नाहीत


 


Ram Mandir | राममंदिराच्या भूमिपूजनाआधी अयोध्येतील पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.