Ram Lalla sculptor Arun Yogiraj : अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाचे शिल्पकार अरुण योगीराज, त्यांची पत्नी आणि मुलांचा अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला आहे. मात्र, दूतावासाने व्हिसा नाकारण्याचे कारण दिलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण योगीराज यांनी कन्नड कुटूस असोसिएशन ऑफ अमेरिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात (विश्व कन्नड कॉन्फरन्स-2024) सहभागी होण्यासाठी अर्ज केला होता. व्हर्जिनियामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. घरच्यांचे म्हणणे आहे ही काही मोठी गोष्ट नाही, ते पुढच्या वर्षी अर्ज करतील. हा टूरिस्ट व्हिसा होता. 


कन्नड कूटस ऑफ अमेरिकेकडून परिषद 


योगीराज यांना 12व्या असोसिएशन ऑफ कन्नड कूटस ऑफ अमेरिका (AKKA) परिषदेत सहभाग घेण्यासाठी अमेरिकेला जायचं होतं. यासाठी त्यांनी अमेरिकेकडे व्हिसाची मागणी केली होती. परंतु त्यांना व्हिसा नाकारण्यात आला. जागतिक कन्नड परिषदेत (WKC 2024) सहभागी होणाऱ्या योगीराजांसाठी हा नकार मोठा धक्का आहे. असोसिएशन ऑफ कन्नड कूटस ऑफ अमेरिकाद्वारे (AKKA) आयोजित ही परिषद 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत रिचमंड, व्हर्जिनिया येथील ग्रेटर रिचमंड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे.


व्हिसा नाकारल्याचे कारण समोर नाहीच


दरम्यान, 'रिपब्लिक टीव्ही'च्या वृत्तानुसार, अरुण योगीराज यांच्या कुटुंबीयांनी व्हिसा न मिळाल्याने निराशा व्यक्त केली आहे. कौटुंबिक व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार अरुण योगीराज यांची पत्नी विजेता या आधीच अमेरिकेला गेल्या होत्या. अशा परिस्थितीत अरुण यांना व्हिसा नाकारणे अगदीच अनपेक्षित आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी अमेरिकेची सर्व तयारी पूर्ण केली होती. तरीही अमेरिकेने व्हिसा नाकारल्याची पुष्टी त्यांनी केली आहे. यावेळी ते म्हणाले की, मला व्हिसा का नाकारला याचे कोणतेही कारण माहित नाही. परंतु आम्ही व्हिसाशी संबंधित सर्व कागदपत्रे जमा केली आहेत. AKKA जागतिक कन्नड कॉन्फरन्स वर्षातून दोनदा आयोजित केली जाते. या कार्यक्रमाचा उद्देश अमेरिकेसह जगाच्या इतर भागात राहणाऱ्या कन्नड समुदायातील सदस्यांना एकत्र आणणे हा आहे, असेही त्यांनी दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या