PM Narendra Modi Celebrating Raksha Bandhan : एकनाथ शिंदे गटातील शिवसेना (Shiv Sena) खासदार भावना गवळी (Bhavana Gawli) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना राखी बांधली. भावना गवळी यांनी फेसबुकवर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली.  भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधतानाचा फोटो पोस्ट केलाय. त्याशिवाय एक मेसेजही लिहिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भावना गवळी यांच्यामध्ये यावेळी कौटुंबिक विचारपूसेसह मतदासंघांच्या अनेक विकासात्मक विषयावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. 


अनेक वर्षापासून पवित्र रक्षाबंधनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छोटी बहिण या नात्याने यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी राखी बांधतात. यंदाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधून आपलं बहीण भावाचं वेगळे नाते जपले. यावेळी कौटुंबिक विचारपूसेसह मतदासंघांच्या अनेक विकासात्मक विषयावर चर्चा झाल्याच कळते. दरम्यान, ईडीने गवळींना नोटीस बजावली आहे. त्यामुळे त्यांचे मोदींसोबतचे हे छायाचित्र चांगलेच व्हायरल झाले आहे.


भावना गवळींची पोस्ट - 



नेटकऱ्यांनी केले ट्रोल - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधतानाची पोस्ट भावना गवळी यांनी केली. ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी भावना गवळींना ट्रोल केलेय. काही दिवसांपूर्वी भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटाला सपोर्ट केला होता. मागील अडीच वर्षांमध्ये भावना गवळी यांच्यामागे ईडीचा समेमिरा लागला होता. त्यांच्या एका विश्वासू व्यक्तीला अटकही करण्यात आली होती. भावना गवळी यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली होती. आता त्या शिंदे गटात दाखल झाल्यामुळे त्यांची ईडी चौकशी संपणार का? असा प्रश्न नेटकरी भावना गवळींना पोस्टमध्ये विचारत आहे.  एका नेटकऱ्याने तर चक्क भावना गवळी यांना 'ईडीच्या शुभेच्छा ताई साहेब,जय बाळासाहेब जय महाराष्ट्र' अशा शुभेच्छा दिल्या आहेत. अन्य एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, 'ED असे अनेक नातेसंबंध बनवायला भाग पाडले.'  


पंतप्रधान मोदी यांच्याकडून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत रक्षाबंधनाच्या पावन दिवसानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले; "आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा."