जींद : दिल्लीच्या सीमेवर तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं गेल्या 70 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यादरम्यान हरयाणातील जिंद येथे आज शेतकरी महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. महापंचायत सुरु असतानाच मंच अचानक तुटला. त्यामुळे मंचावर उपस्थित सर्व लोक खाली कोसळले. ही घटना घडली तेव्हा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आणि इतर नेते उपस्थित होते. पण यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वाचा : शेतकऱ्यांची दूरवस्था थांबवा नाहीतर... ; राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा
या कार्यक्रमासाठी आसपासच्या गावातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी गोळा झाले होते. यावेळी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मंचावर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. घटनेनंतर काही काळ गोंधळ निर्माण झाला मात्र, काही वेळातच पुन्हा महापंचायतीला सुरुवात झाली.
काही वेळातच व्यासपीठ व्यवस्थित केल्यानंतर ते पुन्हा व्यवसपीठावर आले आणि भाग्यवान लोकांचेच व्यासपीठ तुटतात, असं म्हणतं राकेश टिकैत यांनी भाषणाला सुरुवात केली.
महापंचायतीत राकेश टिकैत म्हणाले की, या गावातील ग्रामस्थच नेते आहेत, त्यांना कोणताही नेता नाही. त्यांना थांबवून ठेवलं आहे. हे आंदोलन चालूच राहणार आहे म्हणूनच आलो आहे. जमीन वाचवण्यासाठी हा लढा आहे. घरातील भाकरी आणि अन्नधान्य बंद होणार नाही.
जींदच्या कंडेला गावात महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात अनेक खाप नेते सहभागी झाले होते. याचं आयोजन तकाराम कंडेला यांच्या नेतृत्वात सर्व जातीय कंडेला खाप यांनी केलं होते.
उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील गाजीपूर सीमेवर राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राकेश टिकैट यांनी शेतकर्यांच्या पाठिंबा एकजूट करण्यासाठी जींद येथील महापंचायतीला हजेरी लावली.
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. यात सुमारे 400 जवान जखमी झाले. या घटनेनंतर गाझिपूरमध्ये सुरू असलेलं आंदोलन संपण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण, राकेश टिकैट यांच्या भावनिक आवाहनानंतर शेतकरी आंदोलनाला पुन्हा एकदा नवी उर्जा मिळाली.
Mia Khalifa on Farmer Protest: मिया खलिफाचा शेतकऱ्यांना पाठिंबा, म्हणाली...