Voting for Rajya Sabha seats : राज्यसभेच्या आठ जागांसाठी आज निवडणूक होत आहे. आसाम, केरळ, हिमाचल प्रदेश, नागालँड आणि त्रिपुरामधील आठ जागांसाठी आज मतदान होणार आहे. केरळमधून तीन उमेदवार, आसाममधून दोन उमेदवार आणि हिमाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरामधून प्रत्येकी एक उमेदवार निवडून द्यायचा आहे. दरम्यान, तीन आठवड्यांपूर्वी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपने चार राज्ये जिंकली आहेत. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने विजय मिळवला आहे.


आपच्या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड 


राज्यसभेतील 13 खासदारांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. यापैकी पंजाबच्या पाच खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात पंजाबमधून राज्यसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे (आप) पाचही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आज होणाऱ्या निवडणुकीसाठी आपने माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, पक्षाचे नेते राघव चढ्ढा, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक मित्तल, आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक संदीप पाठक आणि उद्योगपती संजीव अरोरा यांना उमेदवारी दिली होती. पंजाबमधून राज्यसभा निवडणुकीसाठी इतर कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवार उभा केलेला नव्हता. त्यामुळे हे पाचही उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले होते. यामध्ये हरभजन सिंगला संधी देण्यात आली आहे. हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज आहे. जालंधरचा राहणारा हरभजन सिंग याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचे कर्णधारपदही भूषवले आहे.


पंजाबमधील पाच राज्यसभा सदस्यांमध्ये सुखदेव सिंग धिंडसा (एसएडी), नरेश गुजराल (एसएडी), प्रताप सिंग बाजवा (काँग्रेस), शमशेर सिंग दुल्लो (काँग्रेस) आणि श्वेत मलिक (भाजप) यांचा कार्यकाळ 9 एप्रिलला संपत आहे. आसाममधील भाजपच्या प्रवक्त्या पवित्रा मार्गेरिटा यांची सत्ताधारी पक्षाने दोनपैकी एका जागेसाठी निवड केली आहे. युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL) या युनायटेड पीपल्स पार्टीचे रवांगवारा नारझारी हे असलच्या दुसऱ्या जागेवर निवडणूक लढवत आहेत. तथापी, दोन राज्यसभेच्या जागांच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी बुधवारी सांगितले की, त्यांचा संयुक्त उमेदवार सहज जिंकेल. राज्यसभा खासदार आणि काँग्रेसच्या आसाम युनिटचे माजी अध्यक्ष रिपुन बोरा हे विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी केवळ एका जागेवर उमेदवार उभा केला आहे.


केरळमधील तीन राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या महिला विभागाच्या राज्य प्रमुख जेबी माथेर यांना उमेदवारी दिली आहे. माथेर या एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा नगरपालिकेच्या उपाध्यक्ष देखील आहेत. LDF ने कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्स (CPI-M) च्या राज्य समितीचे सदस्य ए.ए. रहीम आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते पी संतोष कुमार यांना उमेदवारी दिली आहे. ते दोन्ही जागा जिंकण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या: