याअंतर्गत दहशतवाद्यांविरोधात चालू असलेल्या ‘ऑपरेशन ऑलआऊट’ला स्थगिती देण्यात आली होती.
शस्त्रसंधी लागू असली तरी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर लष्कराकडून लगेच चोख प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. शस्त्रसंधी मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन ऑलआऊट’ सुरु करण्यात येणार आहे.
''रमजानदरम्यान घेण्यात आलेल्या शस्त्रसंधीच्या निर्णयाची चहूबाजूंनी प्रशंसा करण्यात आली होती. आता दहशतवाद्यांना रोखण्यासाठी लष्कराने कठोर कारवाई करावी,'' असं गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
शस्त्रसंधी लागू करण्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी लष्कर शस्त्रसंधी लागू करण्यास अनुकूल नव्हतं, मात्र जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचं सरकार यासाठी आग्रही होतं.
शस्त्रसंधी लागू केल्यानंतर दहशतवादी हल्यात वाढ झाली. यादरम्यानच दहशतवाद्यांकडून ‘रायजिंग काश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांची हत्या करण्यात आली. तसेच जवान औरंगजेब यांचे अपहरण करून हत्या केली गेली.