Rajinikanth Quits Politics : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतने आपण राजकारणात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचसोबत आपला 'रजनी मक्कल' हा पक्ष त्याने बरखास्त केला असून यापुढे 'रजनी रसीगर नरपानी' या संघटनेच्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे रजनीकांतच्या राजकारणातील प्रवेशांच्या चर्चेवर आता पडदा पडला आहे. 

'रजनी मक्कल मद्रम' या पक्षाची बरखास्ती करताना त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्याने सांगितलं आहे की, आपण भविष्यात राजकारणात येणार नाही. 

 

राजकारणात न येण्याचा निर्णय घेण्यापूर्वी रजनीकांत यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली होती. तसेच रजनीकांत यांनी आपल्या जवळच्या काही लोकांशीही चर्चा केली होती. 

गेल्या वर्षी डिसेबंरमध्ये रजनीकांतने सांगितलं होतं की तो जानेवारी 2021 मध्ये नवीन पक्षाची स्थापना करणार आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या आधी रजनीकांत पक्ष काढणार असल्याने त्याची मोठी चर्चा झाली होती. पण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रजनीकांतने यू टर्न घेतला आणि आपण राजकारणात येणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर रजनीकांतच्या अनेक समर्थकांनी पुन्हा इतर पक्षांमध्ये प्रवेश केला होता. रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणापासून दुरावा पत्करला असला तरीही जनतेसाठी आपण कायमच काम करत राहणार असल्याचा विश्वासही दिला होता. त्यांच्या या घोषणेमुळं आता अनेकांनी निराशा झाली आहे. 

महत्वाच्या बातम्या :