Udaipur Murder Case : राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैया लाल या तरूणाच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटी टीमला धक्कादायक माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया लाल याच्या हत्येतील आरोपी मोहम्मद गौस हा 2014 साली 30 जणांची टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर घेऊन गेला होता. या टीमने दावत-ए-इस्लामीच्या मिरवणुकीत भाग घेतला होता. यादरम्यान गौस आणि इतरांनी 40  दिवस पाकिस्तानातील अनेक इस्लामिक आणि धार्मिक संघटनांच्या लोकांच्या भेटी घेतल्या होत्या. गौस यानेच रियाझ अत्तारी याला प्रशिक्षण दिले होते. तीस जणांच्या या टीममध्ये उदयपूरच्या तीन जणांचा समावेश होता. 


या घटनेत अनेक धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. आता या टीममधील इतर लोक देखील  एसआयटीच्या रडारवर आले असून एसआयटीने तपासाची चक्रे त्या दिशेने फिरवली आहेत.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयटीने अटक केलेल्या रियाझ अटारी आणि मुहम्मद गौस यांच्या मोबाईल आणि ठिकाणांवरून अनेक धक्कादायक व्हिडीओ व पुरावे मिळाले आहेत. एक व्हिडीओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये रियाझ कन्हैया लालवर धारदार चाकूने वार करत आहे. या व्हिडीओमध्ये तो आक्षेपार्ह भाषेत चाकू दाखवून बोलत आहे.  हा चाकू रियाझ यानेच बनवला होता. कारण तो स्वत: फॅब्रिकेटरचे काम करत होता.  


तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, रियाझ हा खूपच रागीट होता. त्याने आणि गौस याने त्यांच्या पाकिस्तानात बसलेल्या म्होरक्याच्या सांगण्यावरून भारतात  काहीतरी वेगळे करण्याचा कट रचला होता.  


रियाझ आणि गौस हे दोघेही पाकिस्तानातील व्यक्तीसोबत बोलत असत. त्यांचे आणि पाकिस्तानमधील व्यक्तीमधील शेवटचे बोलणे देखील समोर आले आहे. यामध्ये पाकिस्तानातील व्यक्ती या दोघांना तुम्ही काहीच करत नाही म्हणून धमकावत आहे. यावेळी रियाझ याने लवकरच काही तर करून दाखवू असा शब्द दिला. त्यानंतर पाकिस्तानातील म्होरक्याचा विश्वास जिंकण्यासाठी रियाझ आणि  गौस यांनी कन्हैयाच्या हत्येचा व्हिडीओ बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी कन्हैया याची हत्या करून त्याचा व्हिडीओ बनवला. 


  महत्वाच्या बातम्या


Udaipur Murder Case : उदयपूरमधील कन्हैया लालच्या हत्येचा तपास आता NIA कडे, दहशतवादी संबंध तपासणार