जयपूर: राजस्थानमधील सरिस्का अभयारण्यात गेल्या चार दिवसांपासून लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आतापर्यंत 700 हेक्टरहून जास्त जंगल या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे. आगीचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी ही आग वनाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पसरली असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, या आगीकडे दुर्लक्ष करत अंजली तेंडुलकरांच्या गाडीचे ड्रायव्हिंग करणाऱ्या सीसीएफ आर एन मीणा या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.
रविवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास या जंगलात आग लागली होती. या आगीची माहिती काही वेळेतच वायरलेसवरुन अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली होती. परंतु या दरम्यान सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर या व्हीआयपी पाहुण्याच्या सेवेत सर्व अधिकाऱ्यांचा लवाजमा उतरला होता. त्यामुळे या आगीची तीव्रता या अधिकाऱ्यांना समजली नसेल किंवा त्यांनी सोपस्कररित्या याकडे दुर्लक्ष केलं असेल. व्हीआयपी पाहुण्याचे सेवेमध्ये लागलेले हे अधिकारी जंगलातील आग विझवायला विसरले.
अंजली तेंडुलकरांच्या गाडीचे ड्रायव्हिंग स्वत: सीसीएफ आर एन मीणा हे करत होते. त्यामुळे या आगीकडे दुर्लक्ष करणे एवढं महागात पडेल याचा त्यांना अंदाज आला नाही. 27 मार्चला लागलेली आग आजही विझली नाही, पण आता या आगीवर नियंत्रण मिळाल्याची माहिती समोर आली आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी वायूसेनेचे दोन हेलिकॉप्टर बोलावण्यात आले आहेत.
बुधवारी, 27 मार्चला संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास अंजली तेंडुलकर या सरिस्का अभयारण्यात पोहोचल्या. त्यानंतर केवळ 15 मिनीटात आग लागल्याची बातमी वायरलेसवरुन अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. सीसीएफ मीणा त्यावेळी त्या ठिकाणी असल्याचं सांगितलं जातंय. या सर्व अधिकाऱ्यांनी त्यावेळी त्या आगीकडे दुर्लक्ष करत अंजली तेंडुलकरांच्या सोबत फोटो काढण्यात धन्यता मानली.
सीसीएफ मीणा ड्रायव्हर
जंगलात लागलेल्या आगीकडे दुर्लक्ष करत अंजली तेंडुलकरांना टायगर सफारी घडवणाऱ्या आणि त्यांच्या गाडीचे स्वत: ड्रायव्हिंग करणाऱ्या सीसीएफ आर एन मीणा यांना निलंबित करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
- Rajasthan Sariska Forest : अलवरच्या सरिस्का जंगलात आगीचा कहर; 20 तासांपासून आग धगधगतीच!
- Rajasthan Sariska Forest : अलवरच्या सरिस्का जंगलात आगीचा कहर