राजस्थानमध्ये बस नदीत कोसळून 26 प्रवाशांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 23 Dec 2017 10:14 AM (IST)
पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. थंडी, त्याचप्रमाणे नदी खोल असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
जयपूर : राजस्थानातील सवाई माधोपूरमध्ये बस नदीत कोसळून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. हलगर्जी आणि बेदरकारपणे बस चालवल्यामुळे प्रवासी बस बनास नदीत कोसळल्याची माहिती आहे. शनिवारी सकाळी प्रवाशांनी भरलेली बस बनास नदीवरील पुलावरुन चालली होती. बस वेगात असताना नियंत्रण सुटल्यामुळे पुलाचे कठडे तोडून बस नदीत कोसळली. अपघातात 26 प्रवाशांना प्राण गमवावे लागले असनू मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि तीन बालकांचा समावेश आहे. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. थंडी, त्याचप्रमाणे नदी खोल असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. घटनास्थळी 10 ते 12 अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत.