राज बब्बर यांनी मंगळवारी कवी केदारनाथ सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक ट्वीट केले आणि त्यातूनही आपल्या राजीनाम्याचे संकेत दिले होते. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले होते, “''अंत में मित्रों, इतना ही कहूंगा कि अंत महज एक मुहावरा है जिसे शब्द हमेशा अपने विस्फोट से उड़ा देते हैं.”
लोकसभा निवडणुकीला नजरेसमोर ठेवून उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून ‘ब्राम्हण चेहरा’ देण्याची शक्यता आहे. जतिन प्रसाद, राजेश मिश्रा किंवा लातेशपती त्रिपाठी यांच्या नावांची चर्चा आहे.
उत्तर प्रदेशात काँग्रेसची स्थिती गेल्या काही निवडणुकांमध्ये विशेष उल्लेखनीय राहिली नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 80 पैकी केवळ 2 जागा, तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीत सपासोबत लढूनही केवळ 7 जागा जिंकता आल्या.
राज बब्बर कोण आहेत?
राज बब्बर यांची हिंदी आणि पंजाबी सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेते म्हणून त्यांची ओळख आहे. सिनेक्षेत्रातील करिअरनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. तीनवेळा लोकसभा खासदार आणि आता राज्यसभेत दुसऱ्यांदा ते गेले आहेत.