अहमदाबाद : जगातल्या सर्वात उंच पुतळ्याचा लौकीक असणाऱ्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'लाही पावसाचा फटका बसला आहे. सरदार पटेल पुतळ्याच्या प्रेक्षक गॅलरीत पाणी शिरले आहे. कालपासून नर्मदा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पुतळ्याच्या 120 मीटर उंचीवर ही प्रेक्षक गॅलरी आहे. या गॅलरीतून सरदार सरोवरचा पूर्ण भाग लोकांना पाहता येतो.
गुजरातमधील नर्मदा धरणाजवळ हा पुतळा उभारण्यात आला आहे. मागील वर्षी 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते.
'स्टॅच्यू ऑफ युनिटी' लोकांसाठी खुले झाल्यापासून मोठ्या संख्येने पर्यटक या स्मारकाला भेट देत आहेत. पावसाळ्यातही येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली नव्हती. परंतु पुतळ्याच्या गॅलरीत पावसाचे पाणी साचल्यामुळे पर्यटक नाराज झाले आहेत.
जिल्हाधिकारी आय.के. पटेल याबाबत म्हणाले की, पुतळ्याच्या गॅलरीत आले आहे. परंतु त्यामध्ये व्यवस्थापनाचा दोष नाही. नर्मदा परिसरात वेगवान वाऱ्यासह पाऊस बरसत आहे. त्यामुळे पाणी गॅलरीत शिरलं आहे.
जगातल्या सर्वात उंच पुतळ्यात पाणी, सरदार पटेल पुतळ्याच्या प्रेक्षक गॅलरीला पावसाचा फटका, पर्यटकांचा हिरमोड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jun 2019 02:43 PM (IST)
जगातल्या सर्वात उंच पुतळ्याचा लौकीक असणाऱ्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'लाही पावसाचा फटका बसला आहे. सरदार पटेल पुतळ्याच्या प्रेक्षक गॅलरीत पाणी शिरले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -