RPF recruitment 2018 : भारतीय रेल्वे बोर्डाने सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या 8624 जागांसाठी websiteconstable.rpfonline.org या ऑफिशिअल वेबसाईटवर नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. या वेबसाईटवर 1 जून ते 30 जून 2018 या काळात अर्ज करता येईल.
यावर्षी रेल्वेने एक लाखांपेक्षा जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. नव्या नोटिफिकेशननुसार, रेल्वे सुरक्षा दलात 9739 कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षकपदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. रेल्वेच्या वेबसाईटवर या दोन्ही जागांसाठी अर्ज करता येईल.
एकूण जागा : 8624
पुरुष कॉन्स्टेबल : 4408
महिला कॉन्स्टेबल : 4216
अर्ज करण्यासाठी पात्रता
अर्जदार भारतीय नागरिक असावा
अर्जदार कोणत्याही बोर्डातून दहावी पास असावा
वय मर्यादा : या जागांसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचं किमान वय 18 वर्षे, तर कमाल वय 25 वर्ष असणं गरजेचं आहे. आरक्षित वर्गांना नियमानुसार सूट दिली जाईल.
निवड पद्धती
अगोदर ऑनलाईन लेखी परीक्षा
त्यानंतर शारीरिक चाचणी
या दोन्ही प्रक्रिया पास झाल्यानंतर उमेदवाराला कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाईल.
या वेबसाईटवर अर्ज करा
www.indianrailways.gov.in
अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी – 500 रुपये
एससी, एसटी, महिला, अल्पसंख्यांक, ईबीसी – 250 रुपये
महत्त्वाच्या तारखा
अर्ज भरण्याची सुरुवात : 1 जून
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 30 जून
ऑनलाईन फी भरण्याची अंतिम तारीख : 2 जुलै
ऑफलाईन फी भरण्याची अंतिम तारीख : 5 जुलै
हॉलतिकीट जारी होण्याची तारीख : परीक्षेच्या दहा दिवस अगोदर
परीक्षेची तारीख : सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2018
नोट : ऑनलाईन फी डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अदा केली जाऊ शकते.
रेल्वेत कॉन्स्टेबलपदाच्या 8624 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jun 2018 04:52 PM (IST)
कॉन्स्टेबल पदाच्या 8624 जागांसाठी websiteconstable.rpfonline.org या ऑफिशिअल वेबसाईटवर नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. या वेबसाईटवर 1 जून ते 30 जून 2018 या काळात अर्ज करता येईल.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -