Railway New Rules : भारतीय रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी देशभरात प्रवास करतात. या प्रवासाच्या काळात अनेक प्रवासी रात्री मोठ्याने गाणी ऐकतात किंवा फोनवर व्हिडिओ आणि रील्स पाहतात, ज्यामुळं इतरांच्या झोपेवर आणि विश्रांतीवर परिणाम होतो. हे लक्षात घेता, रेल्वेने एक नवीन नियम तयार केला आहे. ज्या अंतर्गत प्रवाशांना रात्री 10नंतर ट्रेनमध्ये शांतता राखणे बंधनकारक असणार आहे. 

Continues below advertisement

रील्स आणि गाणी ऐकण्यास बंदी

रेल्वेच्या 'रात्री 10 वाजताच्या नियमानुसार', जर एखादा प्रवासी रात्री मोबाईलवर मोठ्याने गाणी ऐकतो, व्हिडिओ किंवा रील्स पाहतो किंवा कोणत्याही प्रकारचा आवाज करतो, तर त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. हा नियम सर्व गाड्यांमध्ये लागू असेल. प्रवाशांच्या सोयी आणि झोप लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे जेणेकरून सर्वांना आरामदायी प्रवास करता येईल.

नियम मोडल्यास काय होणार कारवाई? 

रेल्वेने हे स्पष्ट केले आहे की हा नियम मोडणाऱ्यांना दंड देखील आकारला जाऊ शकतो. याशिवाय, प्रवाशांकडून तक्रारी आल्यास त्वरित कारवाई करण्याचे अधिकार रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. या पावलामुळे ट्रेनमध्ये रात्रीचा प्रवास अधिक आरामदायी होईल आणि प्रवाशांना कोणत्याही त्रासाशिवाय झोपण्याची संधी मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत 434 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस