विशेष म्हणजे, या स्वच्छ रेल्वे स्टेशनच्या यादीत देशातल्या कोणत्याच मोठ्या रेल्वे स्थानकाचा समावेश नसल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे. देशातल्या टॉप 10 स्वच्छ रेल्वे स्थानकांमध्ये आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम स्थानकाने अव्वल स्थान गाढलं आहे.
रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या टॉप 10 रेल्वे स्थाकांमध्ये
1). विशाखापट्टणम्
2). सिकंदराबाद जंक्शन
3). जम्मू तावी
4). विजयवाडा
5). आनंद विहार टर्मिनल
6). लखनऊ जंक्शन
7). अहमदाबाद
8). जयपूर
9). पुणे जंक्शन
10). बंगळुरु सिटी
याशिवाय मधुबनी स्टेशन आणि जोगबनी स्टेशन ही दोन रेल्वे स्थानके देशातील सर्वात अस्वच्छ स्थानकं असल्याचं या सर्वेत म्हणलं आहे.
या स्वच्छ स्टेशनच्या यादीत मुंबई, कोलकता स्टेशनची नावं नाहीत. तर नवी दिल्ली स्टेशनला टॉप 10 स्टेशनच्या यादीतही स्थान मिळवता आलं नाही. पण दुसरीकडे दिल्लीतील आनंद विहार स्टेशनने या यादीत पाचवं स्थान गाठलं आहे.
दरम्यान, गेल्या वर्षीत या यादीत महाराष्ट्रातील सोलापूर आणि मुंबई सेंट्रल या दोन स्थानकांचा समावेश होता. पण यंदा या दोनपैकी एकालाही या यादीत आपलं स्थान कायम ठेवता आलं नाही. तर पुण्याचा गेल्यावेळी 75 वा क्रमांक होता. पण यंदा पुण्याने थेट टॉप 10 मध्ये जागा मिळवली आहे.