नवी दिल्ली : रेल्वे अप्रेटिंसधारकरांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या जंतरमंतरवर धडक दिली आहे. रेल्वेने नोकरीत सामावून घेण्यासंदर्भातले नियम बदलल्याने अन्याय होत असल्याचा आरोप 2 हजार तरूणांनी अर्ध नग्न प्रदर्शन करुन सरकारचा निषेध केला.
10 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान देशाच्या विविध भागातले रेल्वे अप्रेंटिस धरणं आंदोलन करणार आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना निवेदन देऊनही काही उपयोग झाला नसल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. शिवाय एकीकडे स्किल इंडियाची भाषा पंतप्रधान करतात, पण मग आमच्यासारखे ऑलरेडी स्किल अवगत असलेले युवक रेल्वे का नाकारते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पूर्वी रेल्वे अप्रेटिंसना थेट रेल्वेत सामावून घेतलं जायचं, पण आता त्यासाठी 20 टक्के इतका कोटा ठरवला गेलाय, शिवाय एक लेखी परीक्षाही द्यावी लागते. त्यामुळे रेल्वेतल्या संधी कमी झाल्याचा युवकांचा आरोप आहे. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. यामध्ये अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे.
दिल्लीत सरकारविरोधात हजारो रेल्वे अप्रेंटिसचं अर्धनग्न प्रदर्शन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2017 12:02 PM (IST)
सरकारने नियम बदलल्याने देशभरातील रेल्वे अप्रेंटिस दिल्लीत एकवटले आहेत. 10 ते 20 ऑगस्ट या काळात सरकारविरोधात आंदोलन आणि निदर्शनं केली जाणार आहेत. यामध्ये अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -