शिवराज पाटील-चाकूरकरांच्या मुलाच्या कंपनीवर आयकरचे छापे
एबीपी माझा वेब टीम | 21 Apr 2017 05:15 PM (IST)
मुंबई : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या मुलाच्या कंपनीवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. शैलेश पाटील यांच्या एनव्ही ग्रुप या कंपनीवर इनकम टॅक्स विभागाने धाड टाकली. आयकर विभागाने कारवाईत एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. शैलेश पाटील यांच्यावर बोगस शेअर कॅपिटल गोळा केल्याचा आरोप आहे. तसंच परदेशातल्या खोट्या कंपन्यांत पाटील यांनी पैसे गुंतवल्याचंही म्हटलं जातं. एनव्ही ग्रुप या कंपनीवर दिल्लीच्या आयकर विभागाने कारवाई केली. शैलेश शिवराज पाटील हे एनव्ही ग्रुपचे डायरेक्टर, इन्व्हेस्टर आहेत. आयकर विभागाने केलेल्या कारवाईत पंजाब, दिल्ली, चंडिगढमधील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. कारवाईत एक कोटी रुपयांची रोकड इनकम टॅक्स विभागाने जप्त केली आहे.