पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमातून आठवड्यातून एकदा इंधन न वापरुन बचत करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र इंधनबचत ही वाहनचालकांनी स्वयंस्फूर्तीने करावी, पेट्रोल पंप बंद ठेवणे, हा त्यावरील उपाय नसल्याचं मोदी सरकारने ठणकावून सांगितलं.
https://twitter.com/PetroleumMin/status/854687583821025281
https://twitter.com/PetroleumMin/status/854687101631201280
https://twitter.com/PetroleumMin/status/854688336602165248
https://twitter.com/PetroleumMin/status/854687939447713792
या आठ राज्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबईसह दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक (मुख्यत्वे बंगळुरु भागातील), आंध्र प्रदेश, तेलंगणा, पुदुच्चेरी आणि हरियाणा या राज्यांचा समावेश आहे. 14 मेपासून येणाऱ्या दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने आपण या उपक्रमात सहभागी होणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं. पब्लिक सेक्टरमधील 53 हजार 224 पेट्रोल पंपांपैकी 80 टक्के 'ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन'मध्ये येतात.