नवी दिल्ली : भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एक ट्वीट केला आहे. हा ट्वीट आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या ट्वीटमधून राहुल महाजन यांनी मोदींची स्तुती करत विरोधकांनाही टोला लगावला आहे.
राहुल महाजन यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती करताना ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “एक नेता 13 वर्षे मुख्यमंत्री होता, दोन वर्षांपासून पंतप्रधान आहे. मात्र, अजूनही अमाप संपत्तीचा आरोप नाही किंवा कोणत्याही घोटाळ्याचा आरोप नाही. आरोप कसले होतायेत, तर डिग्री आणि सुटाचे!”
राहुल महाजन यांचा ट्वीट आणि ट्वीटचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत दोन हजारहून अधिक यूझर्सनी हा ट्वीट रिट्विट केला आहे.
राहुल महाजन यांचे वडील म्हणजेच दिवंगत प्रमोद महाजन हे भाजपचे वजनदार नेते होते. मात्र, राहुल महाजन हे राजकारणाच्या आखाड्यात कधीच उतरले नाहीत. त्यांची बहीण पूनम महाजन मुंबईतून खासदार आहेत, तर आतेबहीण पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आहेत.